• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

RTE प्रवेशित विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक लूट थांबणार का? शहापूर तालुक्यात आंदोलनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

शहापूर प्रतिनिधी :

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात शिक्षण हक्क कायदा (RTE) अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून खाजगी शाळांकडून आर्थिक आणि मानसिक शोषण होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित शाळांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून देण्यात आला आहे.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

याबाबत गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती शहापूर कार्यालय यांना निवेदन सादर करण्यात आले असून, शासनाच्या स्पष्ट परिपत्रकानंतरही अनेक खाजगी शाळांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पालकांच्या म्हणण्यानुसार, RTE अंतर्गत मोफत शिक्षणाचा लाभ मिळत असतानाही विद्यार्थ्यांकडून पुस्तके, गणवेश, शूज, स्टेशनरी तसेच SMS चार्जेसच्या नावाखाली पैसे उकळले जात आहेत. काही शाळांकडून ठराविक दुकानांतूनच साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जात असून, बाजारभावापेक्षा जास्त दर आकारले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

अनेक गरीब पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढावे लागत आहे, तर काहींना दागिने गहाण ठेवण्याची वेळ आल्याचे सांगितले जात आहे. शासनाने स्पष्ट आदेश दिलेले असतानाही शाळांकडून नियम धाब्यावर बसवले जात असल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शिक्षण हक्क कायदा २००९ अंतर्गत २५ टक्के RTE कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंत कोणत्याही प्रकारची फी, पुस्तके, गणवेश किंवा स्टेशनरीसाठी पैसे घेता येत नाहीत. या सर्व खर्चाची भरपाई शासनाकडून संबंधित शाळांना केली जाते. तसेच कोणत्याही विशिष्ट दुकानातून साहित्य खरेदी करण्याची सक्ती करू नये, असेही शासनाच्या विविध परिपत्रकांत स्पष्ट करण्यात आले आहे.

तरीदेखील शहापूर तालुक्यातील काही खाजगी शाळांकडून पालकांवर दबाव टाकून आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही पालकांनी असा आरोप केला आहे की, मागण्या पूर्ण न केल्यास विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला जातो किंवा त्यांच्याकडे दुजाभावाने पाहिले जाते.

या सर्व प्रकारामुळे शिक्षण क्षेत्राचे व्यापारीकरण झाल्याची भावना पालकांमध्ये व्यक्त होत असून, शासनाने अशा शाळांचे ऑडिट करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच आवश्यक असल्यास संबंधित शाळांची मान्यता रद्द करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, या प्रकरणी शिक्षण विभाग आणि शासन काय भूमिका घेणार, याकडे पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

भोर–महाड वरंधा घाट मार्गावर दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे ठप्प

Next Post

दोडामार्ग तालुक्यात दुःखद घटना; परमे येथील ३२ वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
19
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
39
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
13
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
46
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
11
Next Post

दोडामार्ग तालुक्यात दुःखद घटना; परमे येथील ३२ वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In