दोडामार्ग :
दोडामार्ग तालुक्यातील परमे येथील रहिवासी शिवाजी लक्ष्मण जाधव (वय ३२) यांचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परमे गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी जाधव यांना सर्पदंश झाल्यानंतर तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. अवघ्या ३२ व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शिवाजी जाधव हे आपल्या मागे वृद्ध आई-वडील, बहीण आणि भाऊ असा परिवार सोडून गेले आहेत. त्यांच्या अकाली निधनामुळे गावात शोककळा पसरली असून सर्व स्तरातून जाधव कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.
