• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत विकासकामांना मंजुरी; सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
47
VIEWS
Ad 1

शहादा : शहादा नगरपरिषदेची अत्यंत महत्त्वपूर्ण सर्वसाधारण सभा गुरुवारी दि. २ रोजी दुपारी ३ वाजता नगरपालिका सभागृहात पार पडली. नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपनगराध्यक्ष सौ. माधवी मकरंद पाटील, मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्यासह सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नगरसेवक आणि विविध विषय समित्यांचे सभापती उपस्थित होते.

शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या अनेक विकासकामांवर सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला विषय क्रमांक १ अंतर्गत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. यावेळी नगरसेवक हरीश पाटील आणि ज्ञानेश्वर चौधरी यांनी मिनिट बुकमध्ये अचूक नोंदी करण्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली. यावर नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी संबंधित मागणीची गांभीर्याने दखल घेत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

RelatedPosts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे सभागृह प्रतोद ज्ञानेश्वर चौधरी आणि नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यात काही विकासकामांच्या मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी झाली. काही काळ सभागृहातील वातावरण तापले होते. अखेरीस दोन्ही बाजूंनी संयम राखण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर वाद निवळला.

या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष सौ. माधवी मकरंद पाटील यांनी मध्यस्थी करत लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहाचा सन्मान राखण्याचे आवाहन केले. तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सदस्यांच्या प्रश्नांना समाधानकारक व माहितीपूर्ण उत्तरे देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नगराध्यक्ष अभिजीत पाटील, संतोष वाल्हे, ललित छाजेड आणि सागर मराठे यांनी काही संवेदनशील विषयांवर आक्रमक, तर काही जनहिताच्या मुद्यांवर संयमी भूमिका घेत सभेचे कामकाज सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला.

सभेतील महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे :

  • मागील सभेचे इतिवृत्त योग्य नोंदींच्या अटीवर मंजूर.
  • नगरसेवकांना क्षमता बांधणी व विविध शासकीय योजनांच्या प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय मंजूर.
  • अमरधाम येथे नवीन रामधून ध्वनी प्रणाली बसविणे व साफसफाईसाठी निधी मंजूर.
  • नगरपरिषदेच्या खुल्या जागा तात्पुरत्या भाड्याने देण्यासाठी शुल्क निश्चितीचा विषय पुढील निर्णयापर्यंत स्थगित.
  • स्वच्छता कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्टीतील कामाचा मोबदला देण्यास मंजुरी.
  • कुकडेल येथील अमरधामसमोरील रस्त्यातील अतिक्रमण हटविण्यास मंजुरी.
  • शहरातील गतिरोधकांवर पांढरे पट्टे व रिफ्लेक्टर पेंट करण्यास मंजुरी.
  • नगरपरिषद प्राथमिक शाळांच्या दुरुस्ती व पायाभूत सुविधांबाबतचा विषय स्थगित.
  • ऊर्जा संवर्धन तंत्रज्ञानांतर्गत मंजूर वातानुकूलन यंत्रणांसाठी स्थळ निश्चिती मंजूर.
  • जुना मोहिदा रस्त्यावर महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र मंजूर.
  • आरक्षण क्र. ३४ मधील भाजी मार्केटची जागा पोलीस स्टेशनसाठी उपलब्ध करून देण्यास मंजुरी.

याशिवाय ऐनवेळी आलेल्या सुमारे बारा विषयांवरही चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली.

सभेत उपनगराध्यक्ष सौ. माधवी मकरंद पाटील, बांधकाम सभापती संतोष वाल्हे, पाणीपुरवठा सभापती प्रदीप ठाकरे, शिक्षण सभापती भावना कदम यांच्यासह नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, हरीश पाटील, ललित छाजेड, सागर मराठे, ॲड. दानिश पठाण आणि वसीम तेली यांनी विविध लोकहिताच्या मुद्यांवर मते मांडली.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

धामणी येथील रेल्वे ब्रिजखालील रस्ता चिखलमय; नागरिकांचा जीव धोक्यात

Next Post

शहादा शहरात अवजड वाहनांसाठी उंची-प्रतिबंधक कमान उभारण्याची मागणी; नगरसेविका ममता पवार यांचे मुख्याधिकाऱ्यांना पत्र

Related Posts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
170
ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
28
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
81
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
Next Post

शहादा शहरात अवजड वाहनांसाठी उंची-प्रतिबंधक कमान उभारण्याची मागणी; नगरसेविका ममता पवार यांचे मुख्याधिकाऱ्यांना पत्र

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In