• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा शहरात अवजड वाहनांसाठी उंची-प्रतिबंधक कमान उभारण्याची मागणी; नगरसेविका ममता पवार यांचे मुख्याधिकाऱ्यांना पत्र

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

शहादा, दि. ०३ (प्रतिनिधी) : शहादा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ मधील जैन प्लाझा ते साईबाबा नगर या अंतर्गत रस्त्यावर वाढलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या मार्गावर तातडीने लोखंडी उंची-प्रतिबंधक कमान उभारण्यात यावी, अशी मागणी प्रभागाच्या नगरसेविका सौ. ममता हेमराज पवार यांनी शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ऐनवेळी उपस्थित करण्यात आलेल्या या विषयाबाबत नगरसेविका ममता पवार यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जैन प्लाझा ते साईबाबा नगर या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची बेकायदेशीर आणि धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

हा रस्ता पूर्णपणे निवासी भागातून जात असून परिसरात विविध खासगी शिकवणी वर्ग आहेत. त्यामुळे लहान मुले, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा या मार्गावर दिवसभर वावर असतो. अवजड वाहनांच्या वाढत्या रहदारीमुळे यापूर्वी परिसरात लहान-मोठे अपघात घडले असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जैन प्लाझा आणि साईबाबा नगरच्या शेवटच्या टोकाला, बायपास राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या मार्गावर लोखंडी उंची-प्रतिबंधक कमान उभारणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ही कमान उभारण्यात आल्यास अवजड वाहनांना अंतर्गत रस्त्यावर प्रवेश करता येणार नाही आणि नागरिक तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास नगरसेविका ममता पवार यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या मागणीमुळे प्रभाग क्रमांक १४ मधील रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त होत असून पालिका प्रशासन या संदर्भात कोणती कार्यवाही करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहादा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत विकासकामांना मंजुरी; सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

Next Post

विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत शहाद्याच्या वसंतराव नाईक विद्यालयाचे घवघवीत यश

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
93
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
37
Next Post

विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत शहाद्याच्या वसंतराव नाईक विद्यालयाचे घवघवीत यश

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In