• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत शहाद्याच्या वसंतराव नाईक विद्यालयाचे घवघवीत यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

शहादा, दि. ०३ : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई यांच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत शहादा येथील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या ऑनलाइन स्पर्धेत एका तासाच्या कालावधीत १०० गुणांसाठी ५० बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यालयातील एकूण २१ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

RelatedPosts

कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; धरणातील पाणीसाठ्यात वाढ…!

नागरिकांच्या तक्रारींना न्याय; पाचकंदील चौकातील निकृष्ट सिमेंट रस्ता उखडून नव्याने दर्जेदार कामास सुरुवात…!

ना. संजय राठोड यांच्या वाढदिनी नेर शहराला रुग्णवाहिकेची भेट; लोकार्पण सोहळा उत्साहात

स्पर्धेत विद्यालयाचा विद्यार्थी अर्जुन कोळी याने संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावला, तर मेहुल बारी याने राज्यात चतुर्थ क्रमांक मिळवून विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. राज्यस्तरीय यश संपादन करणाऱ्या या विद्यार्थ्यांचा आगामी काळात राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते विशेष गौरव सोहळ्यात सत्कार करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरावर रोशन बोरसे यांनी प्रथम, रितिक जाधव यांनी द्वितीय आणि प्रशांत अहिरे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. तसेच तालुकास्तरावर वैभव ईशी यांनी प्रथम, रूपेश मराठे यांनी द्वितीय आणि अल्तमश मन्यार यांनी तृतीय क्रमांक पटकावत विद्यालयाचा लौकिक वाढविला.

या यशाबद्दल विद्यालयात विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव, सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ. वर्षा जाधव, संकुलाचे प्रशासकीय प्रमुख डॉ. हिमांशु जाधव, विद्यालयाचे प्राचार्य जे. एम. पाटील, उपप्राचार्य जे. बी. पवार, उपमुख्याध्यापक बोरसे एस. आर., पर्यवेक्षक खान ए. ए. व खेडकर ए. डी., तसेच केंद्र समन्वयक नेरकर पी. बी. यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे, धनादेश आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन व्ही. एस. पावरा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या सांस्कृतिक समितीच्या सदस्यांनी आणि शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहादा शहरात अवजड वाहनांसाठी उंची-प्रतिबंधक कमान उभारण्याची मागणी; नगरसेविका ममता पवार यांचे मुख्याधिकाऱ्यांना पत्र

Next Post

पारंपरिक पद्धतीने नांगरणी करून संवेदनशीलता दाखवली

Related Posts

ताज्या घडामोडी

कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; धरणातील पाणीसाठ्यात वाढ…!

July 3, 2026
13
ताज्या घडामोडी

नागरिकांच्या तक्रारींना न्याय; पाचकंदील चौकातील निकृष्ट सिमेंट रस्ता उखडून नव्याने दर्जेदार कामास सुरुवात…!

July 3, 2026
2
ताज्या घडामोडी

ना. संजय राठोड यांच्या वाढदिनी नेर शहराला रुग्णवाहिकेची भेट; लोकार्पण सोहळा उत्साहात

July 3, 2026
5
ताज्या घडामोडी

शहादा शहरात अवजड वाहनांसाठी उंची-प्रतिबंधक कमान उभारण्याची मागणी; नगरसेविका ममता पवार यांचे मुख्याधिकाऱ्यांना पत्र

July 3, 2026
1
ताज्या घडामोडी

शहादा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत विकासकामांना मंजुरी; सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

July 3, 2026
14
ताज्या घडामोडी

धामणी येथील रेल्वे ब्रिजखालील रस्ता चिखलमय; नागरिकांचा जीव धोक्यात

July 3, 2026
32
Next Post

पारंपरिक पद्धतीने नांगरणी करून संवेदनशीलता दाखवली

ताज्या बातम्या

अतिक्रमण हटाव मोहिमेवरून पंढरपुरात राडा; नगराध्यक्षा, सत्ताधारी व विरोधी नगरसेवक एकत्र, अधिकाऱ्यांसोबत वाद…

July 3, 2026

कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; धरणातील पाणीसाठ्यात वाढ…!

July 3, 2026

नागरिकांच्या तक्रारींना न्याय; पाचकंदील चौकातील निकृष्ट सिमेंट रस्ता उखडून नव्याने दर्जेदार कामास सुरुवात…!

July 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In