• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पारंपरिक पद्धतीने नांगरणी करून संवेदनशीलता दाखवली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

उपविभागीय अधिकारी खडसे आणि तहसीलदार दिवटे यांनी कृषी दिनानिमित्त केली पेरणी

खामगाव, जि. बुलढाणा : कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना एक सुखद आणि प्रेरणादायी अनुभव देत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी थेट शेतात उतरून पारंपरिक पद्धतीने पेरणी केली. सहसा कार्यालयीन कामकाज आणि फाईलींपुरते मर्यादित असलेले प्रशासन यावेळी काळ्या मातीत उतरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे आणि तहसीलदार अजित दिवटे यांनी खांद्यावर टॉवेल घेत बैलजोडीच्या सहाय्याने पारंपरिक पद्धतीने नांगरणी व पेरणी करत कृषी संस्कृतीप्रती आपली बांधिलकी आणि संवेदनशीलता दाखवून दिली. प्रशासनाच्या या जनहितैषी उपक्रमाचे उपस्थित शेतकऱ्यांनी कौतुक केले.

या उपक्रमामागील उद्देश म्हणजे प्रशासन प्रत्येक परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, हा विश्वास दृढ करणे आणि कृषी क्षेत्राबद्दल समाजात सकारात्मक संदेश पोहोचवणे हा होता.

यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत खरीप हंगामातील परिस्थितीचा आढावा घेतला. पेरणीची प्रगती, शेतातील ओलावा, पावसाची स्थिती तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली.

शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या या उपक्रमामुळे आपले मनोबल वाढल्याची भावना व्यक्त केली. तसेच शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील विश्वास व सहकार्य अधिक दृढ होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आम्हीसुद्धा शेतकरी कुटुंबातून आलो आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत आणि त्यांच्यासमोरील अडचणी आम्हाला चांगल्या प्रकारे समजतात. प्रशासन नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहील आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.”

Previous Post

विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत शहाद्याच्या वसंतराव नाईक विद्यालयाचे घवघवीत यश

Next Post

दुग्ध व्यवसायाला अफवांचा फटका; भेसळखोरांवर कारवाईची मागणी

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
19
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
39
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
13
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
46
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
11
Next Post

दुग्ध व्यवसायाला अफवांचा फटका; भेसळखोरांवर कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In