• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“वऱ्हाड विकास” हे बहुजनांना वैज्ञानिक व पुरोगामी विचारधारा देणारे विचारपत्र – मधुकरराव अभ्यंकर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यालयात “वऱ्हाड विकास”चा ४० वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

अमरावती (प्रतिनिधी) – फुले-शाहू-आंबेडकरांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील समर्थ साक्षीदार असलेल्या “वऱ्हाड विकास” मासिकाच्या ४० व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चैतन्य कॉलनी, अमरावती येथे दि. २ जुलै २०२६ रोजी उत्साहात पार पडला.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुल शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण मधुकरराव अभ्यंकर होते. प्रमुख उपस्थितीत “वऱ्हाड विकास” चे संपादक सत्यशोधक समाजभूषण प्रा. श्रीकृष्ण बनसोड, ज्येष्ठ साहित्यिक व अभंगकार प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले, नाट्यकर्मी प्रा. पुंडलिक भामोदे, लेखिका समाजभूषण डॉ. निर्मला भामोदे, प्राचार्य गजानन वानखडे, सुषमा राम शेकोकार आणि गोविंदराव फसाटे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ, वृक्षरोप व पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.

अभंगकार प्रा. अरुण बुंदेले यांनी त्यांच्या ‘निखारा’ काव्यसंग्रहातील ‘क्रांतिज्योती’ हे वंदनगीत तसेच ‘वऱ्हाड विकास’ या स्वरचित अभंगाच्या सादरीकरणातून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या गायनाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले.

याप्रसंगी प्रा. श्रीकृष्ण बनसोड संपादित “वऱ्हाड विकास” मासिकाच्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविकात प्रा. श्रीकृष्ण बनसोड म्हणाले, “फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वाचन संस्कृती समृद्ध करण्याचे कार्य वऱ्हाड विकास करीत आहे. भाकर माणसाला जगवते, पण वाचनाने जीवन कसे जगावे हे समजते. वाचनामुळे मस्तक घडते आणि ते कोणापुढे नतमस्तक होत नाही.”

अध्यक्षीय भाषणात मधुकरराव अभ्यंकर म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान आणि लोकशाही शासन प्रणाली दिली. मात्र आज लोकशाही धोक्यात आली असून तिचे वस्त्रहरण सुरू आहे. अशा काळात वृत्तपत्र चालविणे म्हणजे सतीचे वाण आहे आणि वऱ्हाड विकासच्या माध्यमातून प्रा. बनसोड यांनी हे कार्य समर्थपणे उभे ठेवले आहे.”

प्रमुख अतिथी प्रा. अरुण बुंदेले यांनी “वंचितांच्या समस्यांना वाचा फोडणारे मासिक म्हणजे ‘वऱ्हाड विकास’” असे म्हणत मासिकाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. तर डॉ. निर्मला भामोदे यांनी “फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार घराघरात पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वऱ्हाड विकास करत आहे,” असे सांगितले.

नाट्यकर्मी प्रा. पुंडलिक भामोदे यांनी “वऱ्हाड विकासने अनेक नवोदित साहित्यिकांना घडविले असून वाचन संस्कृती समृद्ध करण्याचे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे,” असे मत व्यक्त केले.

यावेळी नाट्यकर्मी सुषमा राम शेकोकार यांनी “मी सावित्रीबाई फुले बोलते” हा प्रभावी नाट्यप्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय श्रीखंडे यांनी केले तर प्राचार्य गजानन वानखडे यांनी आभार मानले.

या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक सतीश फुंडकर, प्रा. सुधाकर गावंडे, राजू वाकोडे, कु. शीतल मानेकर, कु. किरण गुर्जर, शिक्षकेतर कर्मचारी मनोज शिरभाते, बाबुराव चक्रे, विद्यार्थी तसेच वऱ्हाड विकासचे वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

गरीबांना केलेली मदत व्यवसायात चौपट प्रगती घडवते – सरकारसाहेब रावल‘सर्विस अबोव्ह सेल्फ’ पुरस्कार विजेते रो. सुरेशभाऊ जैन यांचा दोंडाईच्यात नागरी सन्मान

Next Post

अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र प्रा. डॉ. रवि दलाल यांच्या निवडक कथांचा लोकार्पण सोहळानागपुरात रंगणार भव्य वाङ्मयीन सोहळा

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
19
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
39
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
13
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
46
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
10
Next Post

अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र प्रा. डॉ. रवि दलाल यांच्या निवडक कथांचा लोकार्पण सोहळानागपुरात रंगणार भव्य वाङ्मयीन सोहळा

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In