• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गरीबांना केलेली मदत व्यवसायात चौपट प्रगती घडवते – सरकारसाहेब रावल‘सर्विस अबोव्ह सेल्फ’ पुरस्कार विजेते रो. सुरेशभाऊ जैन यांचा दोंडाईच्यात नागरी सन्मान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

दोंडाईचा (प्रतिनिधी) – दोंडाईचा शहरातील प्रसिद्ध उद्योगपती तसेच रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्सचे ज्येष्ठ सदस्य रो. सुरेशभाऊ जैन यांना रोटरी इंटरनॅशनलचा ‘सर्विस अबोव्ह सेल्फ’ हा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा नागरी सन्मान समारंभ दि. ३० जून रोजी सायंकाळी रोटरी भवन येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लोकनेते सरकारसाहेब रावल होते.

कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्सचे अध्यक्ष प्रविण महाजन, ज्येष्ठ सदस्य रो. डॉ. मुकुंद सोहनी, रो. डॉ. सोहनलाल पारख, रो. राजेश मुणोत, सेक्रेटरी रो. डॉ. अनिल धनगर तसेच बालमित्र उद्योजक मदनलाल चोरडिया (पुणे) व राजेंद्र छाजेड (नाशिक) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रास्ताविकात अध्यक्ष प्रविण महाजन यांनी रोटरी सिनियर्सच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, वर्षभरात तब्बल ४११ प्रकल्प राबविण्यात आले असून शंकरा आय हॉस्पिटल, आनंद यांच्या सहकार्याने १८४१ रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय बॅग वाटप, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे तसेच सिकलसेल ॲनिमिया जनजागृतीसारखे विविध उपक्रम राबविण्यात आले. रो. सुरेशभाऊ जैन यांच्या आर्थिक सहकार्यामुळे अनेक आरोग्य शिबिरे आयोजित करून ११९ रुग्णांवर लघु शस्त्रक्रिया, फिजिओथेरपी, कान-नाक-घसा तपासणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

गेल्या ३७ वर्षांपासून रो. जैन यांनी रोटरीच्या माध्यमातून सातत्याने समाजोपयोगी कार्य केले असून त्याच कार्याची दखल घेत त्यांना हा आंतरराष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

कार्यक्रमात डॉ. मुकुंद सोहनी, डॉ. सोहनलाल पारख, भिमलिंग लिंभारे तसेच माजी नगराध्यक्ष विक्रमबापू पाटील यांनी रो. जैन यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत रोटरी सिनियर्सच्या उपक्रमांचे कौतुक केले.

अध्यक्षीय भाषणात सरकारसाहेब रावल म्हणाले की, “गोरगरीब आणि गरजू घटकांना मदत करणारे हातच खऱ्या अर्थाने समाज समृद्ध करतात. गरीबांसाठी केलेली मदत आणि समाजसेवा हीच व्यवसायात चौपट प्रगती घडवून आणते.” त्यांनी रो. सुरेशभाऊ जैन यांनी आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख केला.

त्यांनी पुढे सांगितले की, रो. जैन यांच्या पुढाकारातून स्थापन झालेली रोटरी नागरी पतसंस्था ही जिल्हा व राज्यातील अग्रगण्य संस्था बनली असून सलग २६ वर्षे ‘अ’ वर्ग दर्जा राखत बेरोजगार युवकांना आर्थिक सहाय्य व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना शिवणयंत्रासाठी मदत करून त्यांना स्वावलंबी बनविण्याचे कार्यही त्यांनी केले आहे.

सत्काराला उत्तर देताना रो. सुरेशभाऊ जैन यांनी हा सन्मान संपूर्ण दोंडाईचा शहराचा असल्याचे सांगितले. समाजसेवेच्या कार्यात पत्नी मंजुदेवी, मुले अभय, चेतन व कीर्ती तसेच संपूर्ण परिवाराचा भक्कम पाठिंबा लाभल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी शहरातील विविध संस्था व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रो. जैन यांचा भव्य सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र पाटील व डॉ. अनिकेत पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. अनिल धनगर यांनी केले.

या सोहळ्यास रोटरी क्लबचे सदस्य, व्यापारी, डॉक्टर, नगरसेवक तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

दुग्ध व्यवसायाला अफवांचा फटका; भेसळखोरांवर कारवाईची मागणी

Next Post

“वऱ्हाड विकास” हे बहुजनांना वैज्ञानिक व पुरोगामी विचारधारा देणारे विचारपत्र – मधुकरराव अभ्यंकर

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
19
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
39
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
13
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
46
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
10
Next Post

"वऱ्हाड विकास" हे बहुजनांना वैज्ञानिक व पुरोगामी विचारधारा देणारे विचारपत्र – मधुकरराव अभ्यंकर

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In