• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नागरिकांच्या तक्रारींना न्याय; पाचकंदील चौकातील निकृष्ट सिमेंट रस्ता उखडून नव्याने दर्जेदार कामास सुरुवात…!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
217
VIEWS
Ad 1

नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे व उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांच्या निर्देशानुसार संयुक्त पाहणी; आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊलीआबा कटके यांनी निकृष्ट कामावर घेतला आक्षेप

प्रतिनिधी

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

शिरूर : शिरूर शहरातील पाचकंदील चौक परिसरात करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी व नाराजी व्यक्त केली जात होती. रस्त्याचा दर्जा, रुंदी, वापरण्यात आलेल्या साहित्याची गुणवत्ता तसेच प्रत्यक्ष कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या पार्श्वभूमीवर २८ मे रोजी नागरिकांच्या भावना व तक्रारींना वाचा फोडणारे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.

नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणीचे आदेश दिले. त्यानुसार उपनगराध्यक्ष मितेश गादिया, नगरसेवक, नगरसेविका तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाचकंदील चौकातील सिमेंट रस्त्याची संयुक्त पाहणी केली.

यानंतर ६ जून रोजी शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊलीआबा कटके यांनी नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे, उपनगराध्यक्ष मितेश गादिया, नगरसेवक, नगरसेविका व संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. पाहणीदरम्यान आमदार कटके यांनी रस्त्याच्या कामातील गुणवत्तेबाबत गंभीर आक्षेप नोंदवत हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी संबंधित ठेकेदाराशी दूरध्वनीवर संपर्क साधून तांत्रिक निकषांनुसार दर्जेदार काम करण्याच्या सक्त सूचना दिल्या.

पाहणीदरम्यान नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी व कामातील त्रुटींची सखोल तपासणी करण्यात आली. नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे आणि उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांनी बांधकाम विभागाला आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर संबंधित ठेकेदाराला तातडीने बोलावून कामाबाबत जाब विचारण्यात आला.

यावेळी संबंधित ठेकेदाराला संपूर्ण सिमेंट रस्ता स्वखर्चाने उखडून तांत्रिक निकषांनुसार नव्याने दर्जेदार काम करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आज पाचकंदील चौकातील सिमेंट रस्ता पूर्णपणे उखडण्याचे काम सुरू करण्यात आले असून नव्याने होणारे काम सर्व तांत्रिक निकषांचे पालन करून गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कामाचा संपूर्ण खर्च संबंधित ठेकेदाराकडूनच करण्यात येणार आहे.

सार्वजनिक निधीतून होणाऱ्या विकासकामांमध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी घेतली आहे. प्रत्येक विकासकामाची गुणवत्ता, पारदर्शकता आणि टिकाऊपणा कायम राखण्यासाठी बांधकाम विभागाला सातत्याने देखरेख ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या कारवाईमुळे पाचकंदील चौकातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने दखल घेत निकृष्ट कामावर कारवाई करण्यात आल्याने नगरपरिषदेच्या उत्तरदायित्वपूर्ण भूमिकेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

निकृष्ट कामावर तातडीची कारवाई :

  • २८ मे रोजी नागरिकांच्या तक्रारींवर वृत्त प्रसिद्ध.
  • नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी तातडीने दखल घेतली.
  • ६ जून रोजी आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊलीआबा कटके यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
  • संबंधित ठेकेदाराला दूरध्वनीवर जाब विचारत दर्जेदार कामाच्या सूचना.
  • उपनगराध्यक्ष मितेश गादिया, नगरसेवक, नगरसेविका व अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी.
  • संबंधित ठेकेदाराला स्वखर्चाने संपूर्ण रस्ता उखडण्याचे आदेश.
  • नव्याने होणारे काम तांत्रिक निकषांनुसार पूर्ण करण्याच्या सूचना.
Tags: Avinash Ghogare
Previous Post

ना. संजय राठोड यांच्या वाढदिनी नेर शहराला रुग्णवाहिकेची भेट; लोकार्पण सोहळा उत्साहात

Next Post

कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; धरणातील पाणीसाठ्यात वाढ…!

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post

कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; धरणातील पाणीसाठ्यात वाढ...!

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In