• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; धरणातील पाणीसाठ्यात वाढ…!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
63
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :-

कोयना : कोयना धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून धरण क्षेत्रातील नद्यांना व ओढ्यांना चांगला पूर आला आहे.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे ६५ मिलिमीटर, तर महाबळेश्वर येथे ५३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही संततधार पाऊस सुरू असल्याने अवघ्या दोन दिवसांत धरणातील पाणीसाठ्यात जवळपास अर्धा टीएमसीने वाढ झाली आहे.

मंगळवारी सकाळी कोयना धरणात सुमारे २ हजार ७५८ क्यूसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती. सध्या धरणातील एकूण पाणीसाठा १४.४८ टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आगामी दिवसांत पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वर तसेच संपूर्ण कांदाटी खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. याचबरोबर धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी आणि बलकवडी धरण परिसरातही पावसाची चांगली नोंद होत आहे.

दरम्यान, राधानगरी धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून पश्चिम महाराष्ट्रातील जलसाठ्यांना याचा मोठा फायदा होत आहे. तुलनेने करवीर, हातकणंगले, शिरोळ आणि कागल या पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी असले तरी पश्चिमेकडील मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये हळूहळू पाणी वाढत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील २४ ते ४८ तासांत घाटमाथा परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याने कोयना व इतर धरणांच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ अपेक्षित आहे.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

नागरिकांच्या तक्रारींना न्याय; पाचकंदील चौकातील निकृष्ट सिमेंट रस्ता उखडून नव्याने दर्जेदार कामास सुरुवात…!

Next Post

अतिक्रमण हटाव मोहिमेवरून पंढरपुरात राडा; नगराध्यक्षा, सत्ताधारी व विरोधी नगरसेवक एकत्र, अधिकाऱ्यांसोबत वाद…

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post

अतिक्रमण हटाव मोहिमेवरून पंढरपुरात राडा; नगराध्यक्षा, सत्ताधारी व विरोधी नगरसेवक एकत्र, अधिकाऱ्यांसोबत वाद...

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In