• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अतिक्रमण हटाव मोहिमेवरून पंढरपुरात राडा; नगराध्यक्षा, सत्ताधारी व विरोधी नगरसेवक एकत्र, अधिकाऱ्यांसोबत वाद…

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in Blog
0
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :-

पंढरपूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांकडून शहरात संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र, जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आलेल्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप करत नगराध्यक्षा प्रणिता भालके यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नगरसेवक प्रशासनाविरोधात एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होणार असल्याने शहरातील मुख्य रस्ते, पालखी मार्ग, प्रदक्षिणा मार्ग तसेच विठ्ठल मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत रस्त्यांवरील अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या, जाहिरात फलक आणि कायमस्वरूपी झालेले अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात येत आहे.

मात्र, जेसीबीच्या सहाय्याने अचानक अतिक्रमण हटवण्यात आल्याने अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला. “व्यापाऱ्यांचे नुकसान होत असेल तर त्याची भरपाई कोण देणार?” असा सवाल नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी उपस्थित केला.

कारवाईनंतर नगराध्यक्षा, सत्ताधारी आणि विरोधी आघाडीतील सर्व नगरसेवक व्यापाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरले. व्यापाऱ्यांना पूर्वसूचना आणि अल्टिमेटम न देता थेट कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी प्रशासनावर केला. तसेच नगरसेवकांना विश्वासात न घेता ही मोहीम राबवण्यात आल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली.

यावेळी नगराध्यक्षा आणि नगरसेवकांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत कारवाईच्या पद्धतीवर आक्षेप घेतला. व्यापाऱ्यांना वेळ देऊन, पर्यायी व्यवस्था करून मगच अतिक्रमण हटवावे, अशी मागणी करण्यात आली. या दरम्यान प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, आषाढी वारीच्या काळात वारकऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी रस्ते मोकळे ठेवणे आवश्यक असल्याची भूमिका प्रशासनाकडून मांडण्यात येत आहे. मात्र, या कारवाईमुळे व्यापारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, अतिक्रमण हटाव मोहिमेला अप्रत्यक्षपणे राजकीय विरोध होत असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.

Previous Post

कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; धरणातील पाणीसाठ्यात वाढ…!

Next Post

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची धोरजा गावाला भेट; ग्रामस्थांना समस्या सोडवण्याचे आश्वासन…

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
19
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
39
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
13
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
46
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
10
Next Post

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची धोरजा गावाला भेट; ग्रामस्थांना समस्या सोडवण्याचे आश्वासन...

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In