• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर विद्यालयाचे ग्रंथपाल राजेश्वर खेडकर सेवानिवृत्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

२८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर भावपूर्ण निरोप

परभणी | प्रतिनिधी

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर विद्यालयाचे ग्रंथपाल तथा सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेश्वर खेडकर हे २८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर दि. ३० जून २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.

RelatedPosts

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

खेडकर सरांनी १९९७ साली ग्रंथपाल पदाची सूत्रे स्वीकारली. गेल्या २८ वर्षांत त्यांनी विद्यालयाचे ग्रंथालय केवळ पुस्तकांचे भांडार न ठेवता विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने ज्ञानमंदिर बनवले. त्यांच्या कार्यकाळात ग्रंथालयातील पुस्तकांची संख्या, विद्यार्थ्यांची वाचनाची आवड आणि ग्रंथालयाचा दर्जा लक्षणीयरीत्या वाढला. “वाचाल तर वाचाल” हा संदेश त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या मनात रुजवला.

सेवानिवृत्ती निमित्त आयोजित निरोप समारंभात विद्यालयाच्या वतीने खेडकर सरांचा सपत्निक शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अच्युतराव भोसले होते. प्रमुख उपस्थितीत विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एम. एस. निलंगे, डी. आर. गव्हाणे, कै. बाजीराव देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार धबडे, सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे मार्गदर्शक सतीश देशमुख, प्रा. डॉ. संतोष रनखांब, पर्यवेक्षक रमाकांत होडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमास संस्थेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथ वाचन चळवळीचे पदाधिकारी, पत्रकार, प्राध्यापक, मित्रमंडळ, माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुख्याध्यापक अच्युतराव भोसले यांनी खेडकर सरांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “खेडकर सर म्हणजे ग्रंथालयाचा चालता-बोलता कोश होते. कोणत्या कपाटात कोणते पुस्तक आहे, हे त्यांना तोंडपाठ होते. त्यांनी शाळेला दिलेले योगदान अविस्मरणीय आहे.”

माजी मुख्याध्यापक एम. एस. निलंगे, राजकुमार धबडे आणि सतीशराव देशमुख यांनीही खेडकर यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या निवृत्तीनंतरचे आयुष्य निरोगी, आनंदी व समाधानाचे जावो, अशा शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना भावूक झालेले राजेश्वर खेडकर म्हणाले, “हे विद्यालय आणि ग्रंथालय हेच माझे कुटुंब होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पुस्तक वाचतानाचा आनंद पाहणे हेच माझ्या सेवेचे खरे फळ होते. सर्वांच्या प्रेमाबद्दल मी ऋणी आहे.”

ते पुढे म्हणाले की, सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीच्या माध्यमातून ग्रंथप्रेमींच्या सहकार्याने लाखो रुपयांची पुस्तके शाळेसह महाराष्ट्रातील अनेक शाळांना उपलब्ध करून देण्याचे भाग्य लाभले. लोप पावत चाललेली वाचन संस्कृती जपण्यासाठी केलेले कार्य हेच आयुष्यातील मोठे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली. अनेक माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून सरांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव निळे यांनी केले, तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पर्यवेक्षक रमाकांत होडगे यांनी केले.

श्री महालिंगेश्वर विद्यालय परिवार व सोनपेठकर नागरिकांच्या वतीने राजेश्वर खेडकर यांच्या निवृत्तीनंतरच्या आरोग्यदायी व आनंदी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

खटाव तालुक्यात पावसाचे आगमन; शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे मदतीची मागणी

Next Post

रूढ़ियों को दरकिनार कर अनोखा सत्यशोधक विवाह संपन्न

Related Posts

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
34
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
13
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
21
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
22
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
74
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
Next Post

रूढ़ियों को दरकिनार कर अनोखा सत्यशोधक विवाह संपन्न

ताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन : ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा उत्सव*

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन : ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा उत्सव*

October 4, 2026
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In