शिरूर प्रतिनिधी
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीला उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला असून, मतदार यादी बेकायदेशीर ठरवत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नव्याने पात्र मतदार यादी तयार करून त्यानंतरच निवडणूक प्रक्रिया राबवावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध गटांनी सुरू केलेल्या हालचालींना या निर्णयामुळे मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता नव्याने मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया कधी सुरू होणार आणि पुढील निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार, याकडे शेतकरी, व्यापारी, कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.
या निर्णयानंतर शिरूर तालुक्यात राजकीय चर्चांना वेग आला असून, बाजार समितीच्या आगामी निवडणुकीत नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
