• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाथरी येथे ६ जुलै रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 4, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी / परभणी

परभणी, दि. ३ जुलै २०२६ : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी, डीजेपी एज्युकेशनल कॅम्पस, पोहेटाकळी तसेच अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर (दिंडोरी प्रणित) शाखा शिवाजीनगर, पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे.

RelatedPosts

साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दगडवाडी येथे दुष्काळी पाहणी

हा रोजगार मेळावा पाथरी येथील डीजेपी एज्युकेशनल कॅम्पस, पोहेटाकळी येथे पार पडणार असून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत गरजू व सुशिक्षित बेरोजगारांना खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात राज्यातील विविध नामांकित उद्योगसमूह, कंपन्या आणि खाजगी आस्थापनांचा सहभाग राहणार आहे. दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर आदी पात्रता असलेल्या उमेदवारांची क्षेत्र अधिकारी (SFO), क्षेत्र अधिकारी (RO), ट्रेनी ऑपरेटर, विमा सल्लागार, विमा सखी, लाईफ मित्र, ऑफिस स्टाफ आदी पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

निवड होणाऱ्या उमेदवारांना सुरुवातीला रु. १० हजार ते रु. १८ हजारांपर्यंत वेतन दिले जाणार असून अनुभव व कामगिरीनुसार वेतनवाढीची संधीही उपलब्ध राहणार आहे.

रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी.

MahaSwayam पोर्टल

तसेच मेळाव्याच्या ठिकाणीही नाव नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह स्वखर्चाने दि. ६ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक ०२४५२-२२००७४ वर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीला न्यायालयाचा मोठा दणका

Next Post

महात्मा फुले दांपत्याला संयुक्त मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्यावे

Related Posts

साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
Blog

साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

October 3, 2026
5
खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
Blog

खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

October 3, 2026
32
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दगडवाडी येथे दुष्काळी पाहणी
Blog

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दगडवाडी येथे दुष्काळी पाहणी

October 3, 2026
4
Blog

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण

October 3, 2026
7
Blog

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026
8
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर
Blog

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

October 3, 2026
1
Next Post

महात्मा फुले दांपत्याला संयुक्त मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्यावे

ताज्या बातम्या

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

October 3, 2026
खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In