• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नसरापुरात ६० दिवसात न्याय, मग गोंडगावच्या बालिकेला अजून का नाही?

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 4, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

भाजप नेते अनिल वाघ यांचा आमदार किशोर पाटील यांना थेट सवाल

भडगाव प्रतिनिधी

RelatedPosts

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

भडगाव तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या अत्याचार व हत्या प्रकरणातील पीडितेला अवघ्या ६० दिवसांत न्याय मिळतो, मग गोंडगाव येथील बालिकेला तब्बल तीन वर्षांनंतरही न्याय का मिळत नाही? असा संतप्त सवाल भाजप नेते अनिल वाघ यांनी उपस्थित केला आहे. स्थानिक आमदार म्हणून ही नैतिक जबाबदारी असताना संवेदनशील प्रश्नावर ठोस भूमिका घेण्याऐवजी आमदारांकडून भाजप पदाधिकाऱ्यांवर आरोप केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

भडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत अनिल वाघ बोलत होते. यावेळी त्यांनी आमदार किशोर पाटील यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. वाघ म्हणाले की, २०२३ मध्ये ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली होती. त्यावेळी सर्वांनी मिळून गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची जबाबदारी आमदारांवर सोपवली होती. मात्र, आजही प्रकरण प्रलंबित असताना लोकप्रतिनिधी म्हणून शासनाला जाब विचारण्याऐवजी आमच्यावरच आरोप केले जात आहेत, ही दुर्दैवी बाब आहे.

पत्रकार परिषदेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे :

  • घटनेनंतर भाजप प्रदेशाध्यक्षांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन तातडीची मदत केली होती.
  • तत्कालीन मंत्री अनिल पाटील यांनीही कुटुंबाला सहकार्य केले होते.
  • पीडित कुटुंबाला घरकुल देण्याचे आश्वासन आमदारांनी दिले होते; त्याचे पुढे काय झाले, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
  • गोंडगावच्या बालिकेला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ पाटील, तालुकाध्यक्ष विनोद नेरकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट)चे हर्षल पाटील, किरण शिंपी, प्रदीप पाटील, निलेश पाटील, देविदास पाटील, विशाल चौधरी, आबा महाजन, सोनू पाटील, सचिन पवार, अशोक पाटील, कार्यालयीन प्रमुख कुणाल पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

महात्मा फुले दांपत्याला संयुक्त मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्यावे

Next Post

ठाकर आडगावच्या भूमिपुत्राचा मुंबईत राज्यपालांच्या हस्ते गौरव

Related Posts

Blog

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026
8
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर
Blog

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

October 3, 2026
1
जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी
Blog

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

October 3, 2026
1
मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
Blog

मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

October 3, 2026
19
२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद
Blog

२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद

October 3, 2026
1
Blog

कायगावच्या झोपडपट्टीत दोन दिवसांपासून अंधार!

October 3, 2026
2
Next Post

ठाकर आडगावच्या भूमिपुत्राचा मुंबईत राज्यपालांच्या हस्ते गौरव

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In