• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ठाकर आडगावच्या भूमिपुत्राचा मुंबईत राज्यपालांच्या हस्ते गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

बाबु कोकाट यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य शासनाचा ‘शेतीमित्र’ पुरस्कार प्रदान

गेवराई प्रतिनिधी

RelatedPosts

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन

गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथील शेतकरी मित्र बाबु (त्रिंबक) कोकाट यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. बुधवार, दि. १ जुलै रोजी मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र तसेच एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश असे होते. यावेळी बाबु कोकाट यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, आयुक्त सुरज मांढरे, राज्याचे कृषीभूषण पुरस्कार विजेते प्रकाश पाटील, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच राज्यभरातील कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी उपस्थित होते.

बाबु कोकाट यांनी गेल्या सात ते आठ वर्षांपासून संध्या मल्टी सर्व्हिसेस व सीएससी केंद्रामार्फत “युवा शेतकरी मित्र” संकल्पनेअंतर्गत शेतकरी हिताची विविध कामे केली आहेत. त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती दिली. त्यांच्या या कार्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला असून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, कृषी उपसंचालक जाधवर, तंत्र अधिकारी मगर व वाघ, कृषी विज्ञान केंद्र खामगावचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. हनुमान गरुड, गेवराई तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, अभयकुमार वडकुते, मंडळ कृषी अधिकारी मस्के, सहाय्यक कृषी अधिकारी सुहास शिंदे, सूरपम, बीजी सीएससीचे दिनेश जाधव, वैभव डोंगरे, उपकृषी अधिकारी श्रीराम पवार, प्रकाश वाघमारे, आत्मा विभागाचे पठाण, काळे, जोशी, शिंदे, घोडके तसेच शेतकरी बांधव व मित्रपरिवाराकडून बाबु कोकाट यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

Tags: Samadhan Samrat
Previous Post

नसरापुरात ६० दिवसात न्याय, मग गोंडगावच्या बालिकेला अजून का नाही?

Next Post

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर दोडामार्ग येथील ख्रिश्चन बांधवांचे उपोषण मागे

Related Posts

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
20
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण
ताज्या घडामोडी

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026
26
मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन
ताज्या घडामोडी

मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन

October 3, 2026
12
ताज्या घडामोडी

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेळ्या दगावल्या; २३ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई रखडली

October 3, 2026
9
अकोल्यात ३ ऑक्टोबरला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधणार संवाद
ताज्या घडामोडी

अकोल्यात ३ ऑक्टोबरला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधणार संवाद

October 3, 2026
13
कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी
ताज्या घडामोडी

कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी

October 2, 2026
123
Next Post

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर दोडामार्ग येथील ख्रिश्चन बांधवांचे उपोषण मागे

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In