• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महायुती सरकारच्या छाताडावर दिबांच्या नावाचा झेंडा रोवणार; ८ जुलै रोजी विधानभवनावर मोर्चा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 4, 2026
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

रश्मिताताई पोपेटा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन; पनवेलच्या शिवाजी चौकातून मोर्चाची सुरुवात

खारपाडा पेण | प्रतिनिधी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत शासनाकडून होत असलेल्या विलंबाविरोधात समाजबांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, या पार्श्वभूमीवर येत्या ८ जुलै रोजी विधानभवनावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते दिबाप्रेमी नामकरण समितीच्या बॅनरखाली होणाऱ्या या आंदोलनाचे नेतृत्व रश्मिताताई पोपेटा करणार आहेत.

RelatedPosts

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

रश्मिताताई पोपेटा यांनी रुग्णालयात उपचार सुरू असतानाही आंदोलन सुरू ठेवले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली दिबा प्रेमींनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि नारळ वाढवून मोर्चाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे प्रमुख सदस्य तथा माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा एसटी स्टँडमार्गे कळंबोलीकडे आणि तेथून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. या मोर्चात सुमारे १५ हजार आंदोलक सहभागी होतील, असा दावा आयोजकांनी केला आहे.

पनवेल, उरण, पेण, अलिबाग, रोहा, खालापूर, कर्जत, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी, वसई, विरार, पालघर आदी भागांत गाव बैठका घेऊन आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले. महिला संघटना, कलाकार संघटना, बैलगाडा संघटना, २७ गाव संघटना, १० गाव संघटना, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, औषध विक्री संघटना तसेच आगरी समाज संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी सांगितले की, कोविड काळात राज्य सरकारविरोधात आंदोलने झाली; मात्र विमानतळ नामकरणाच्या प्रश्नावर महायुती सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. “८ जुलैचे आंदोलन अभूतपूर्व ठरेल,” असा दावा त्यांनी केला.

या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस महासंचालक सदानंद दाते, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, कोकण आयुक्त रुबल अग्रवाल, पनवेल तहसीलदार मिनल भामरे-भोसले यांच्यासह संबंधित प्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे माहिती देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

या आंदोलनात रश्मिताताई पोपेटा, खासदार बाळ्यामामा ऊर्फ सुरेश म्हात्रे, माजी आमदार बाळाराम पाटील, मनोहरशेठ भोईर, उरणच्या नगराध्यक्ष भावना घाणेकर, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

Previous Post

उरणमध्ये आदिवासी कुटुंबाला जमिनीचा ताबा देण्याचे आदेश; सात दिवसांत ताबा न दिल्यास पोलिस बंदोबस्तात कारवाई

Next Post

उत्तर रायगड कामगार आघाडीची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात संपन्न; राजपाल शेगोकार यांचा वाढदिवसही साजरा

Related Posts

Blog

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026
1
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर
Blog

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

October 3, 2026
1
जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी
Blog

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

October 3, 2026
1
मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
Blog

मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

October 3, 2026
1
२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद
Blog

२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद

October 3, 2026
1
Blog

कायगावच्या झोपडपट्टीत दोन दिवसांपासून अंधार!

October 3, 2026
1
Next Post

उत्तर रायगड कामगार आघाडीची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात संपन्न; राजपाल शेगोकार यांचा वाढदिवसही साजरा

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In