• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उरणमध्ये आदिवासी कुटुंबाला जमिनीचा ताबा देण्याचे आदेश; सात दिवसांत ताबा न दिल्यास पोलिस बंदोबस्तात कारवाई

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 4, 2026
in Blog
0
0
SHARES
90
VIEWS
Ad 1

उरण | प्रतिनिधी

उरण तालुक्यातील दिवेखोडे येथील आदिवासी कुटुंबाच्या जमिनीचा ताबा कायदेशीर वारसांना देण्याचे आदेश महसूल प्रशासनाने दिले आहेत. मंडळ अधिकारी, जासई यांनी यासंदर्भात संबंधितांना नोटीस बजावली असून, सात दिवसांच्या आत स्वखुशीने जमिनीचा ताबा देण्याचे निर्देश दिले आहेत.

RelatedPosts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

मिळालेल्या माहितीनुसार, आदिम आदिवासी सामाजिक संस्था, पोयेज यांच्या पुढाकाराने व संस्थापक अध्यक्षांच्या माध्यमातून दिवेखोडे येथील गोपाळ लहाण्या कातकरी यांच्या कायदेशीर वारसांना सर्वे क्रमांक १४/८ व १००/१ या जमिनीचा ताबा मिळावा, यासाठी तहसील कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात आला होता.

तहसीलदार, उरण यांनी दिलेल्या आदेशानुसार मंडळ अधिकारी, जासई आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांना संबंधित जमिनीचा ताबा कायदेशीर वारसांकडे देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नोटीसमध्ये संबंधित जमीनधारकास पत्र प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांच्या आत स्वखुशीने जमिनीचा ताबा द्यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अन्यथा १७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पोलिस बंदोबस्तात संबंधित जमिनीचा ताबा कायदेशीर वारसांना देण्यात येईल, असा इशाराही महसूल प्रशासनाने दिला आहे.

या कारवाईमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आदिवासींच्या जमीनहक्काच्या प्रश्नाला न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, आदिवासी समाजामध्ये समाधानाचे वातावरण आहे. तसेच अशा प्रकरणांमध्ये प्रशासनाने तत्परतेने कारवाई करून आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणीही स्थानिकांकडून होत आहे.

Previous Post

आदिम आदिवासी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम; आदिवासी पाड्यांवर मोफत अभ्यासिका, विविध सामाजिक कामांना वेग

Next Post

महायुती सरकारच्या छाताडावर दिबांच्या नावाचा झेंडा रोवणार; ८ जुलै रोजी विधानभवनावर मोर्चा

Related Posts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
6
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही
Blog

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026
10
Blog

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026
33
Blog

विद्या मंदिर गुडाळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 17, 2026
61
ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम
Blog

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम

August 17, 2026
41
नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…
Blog

नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…

August 17, 2026
23
Next Post

महायुती सरकारच्या छाताडावर दिबांच्या नावाचा झेंडा रोवणार; ८ जुलै रोजी विधानभवनावर मोर्चा

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In