• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अनुसूचित जाती आरक्षणात ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणाची जोरदार मागणी; शिरूरमध्ये जनआक्रोश मोर्चा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 5, 2026
in Blog
0
0
SHARES
30
VIEWS
Ad 1

तहसीलदारांना निवेदन सादर; राज्य शासनाकडे तातडीने सकारात्मक शिफारस करण्याची मागणी

प्रतिनिधी

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

शिरूर : अनुसूचित जातीतील मातंग समाजाला न्याय्य आरक्षणाचा वाटा मिळावा तसेच अनुसूचित जाती आरक्षणामध्ये ‘अ, ब, क, ड’ अंतर्गत उपवर्गीकरण लागू करून प्रत्येक घटकाला सामाजिक, शैक्षणिक व प्रतिनिधित्वाच्या आधारे न्याय्य वाटा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी शिरूर शहरात सकल मातंग समाजाच्या वतीने भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (मार्केट यार्ड) ते शिरूर तहसील कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयाच्या आवारात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मोर्च्याची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शिरूर तहसीलदारांना निवेदन देऊन राज्य शासनाकडे तातडीने सकारात्मक शिफारस करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनुसूचित जातीतील मातंग समाज हा अनेक दशकांपासून सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास राहिला असून विद्यमान आरक्षण व्यवस्थेचा अपेक्षित लाभ समाजातील मोठ्या घटकापर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे समाजामध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. अनुसूचित जाती आरक्षणामध्ये ‘अ, ब, क, ड’ अंतर्गत उपवर्गीकरण करून प्रत्येक घटकाला न्याय्य प्रतिनिधित्व देणे ही काळाची गरज असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

यावेळी निवेदनाद्वारे अनुसूचित जाती आरक्षणामध्ये ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण तात्काळ लागू करावे, मातंग समाजाला स्वतंत्र व न्याय्य आरक्षणाचा वाटा द्यावा, शैक्षणिक प्रवेश, सरकारी नोकऱ्या व विविध शासकीय योजनांमध्ये प्रभावी प्रतिनिधित्व मिळावे, तसेच समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी विशेष योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

मोर्चादरम्यान उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, कर्नाटक, तेलंगणा यांसह काही राज्यांनी अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाची अंमलबजावणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०२४ मध्ये दिलेल्या निर्णयानंतर महाराष्ट्र शासनानेही तातडीने यासंदर्भातील कायदा विधानसभेत मंजूर करून ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण लागू करावे, अशी समाजाची ठाम अपेक्षा आहे.

यावेळी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे, अजिंक्यभैय्या चांदणे (प्रदेशाध्यक्ष, डेमोक्रॅटिक पार्टी), राजेश घोडे (संस्थापक अध्यक्ष, आझाद हिंद सेना), नगीना सोमनाथ कांबळे (संस्थापक, आधुनिक लहुजी सेना) आणि युवा नेते अमोल शेरकर यांनी मार्गदर्शन करत मातंग समाजाच्या घटनात्मक हक्कांसाठी संघटितपणे लोकशाही मार्गाने संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.

अजिंक्यभैय्या चांदणे यांनी आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भातील विविध बाबी समाजासमोर मांडल्या. समाजातील महापुरुषांबाबत सामाजिक माध्यमांवर होत असलेल्या आक्षेपार्ह टिप्पण्यांचाही त्यांनी निषेध नोंदवत त्या उपस्थितांसमोर वाचून दाखवल्या. तर विष्णूभाऊ कसबे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ देत महाराष्ट्र शासनाने तातडीने कायदा पारित करून अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण लागू करण्याची मागणी केली.

मातंग समाजाच्या न्याय्य हक्कांच्या दृष्टीने शासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. संविधानाने दिलेल्या समान संधी व सामाजिक न्यायाच्या तत्त्वानुसार मातंग समाजाला न्याय मिळणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.

या प्रसंगी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे, अजिंक्यभैय्या चांदणे, राजेश घोडे, अमोल शेरकर, नगीना कांबळे, नगरसेविका तथा सभापती स्वाती साठे, माजी नगरसेविका रेश्मा लोखंडे, आयोजक विनोद (पप्पू) साठे, विशाल (बंटी) जोगदंड, दादाभाऊ लोखंडे, चेतन साठे, रवींद्र खुडे, मोनिका जाधव, रियाज सय्यद, भाऊसाहेब जाधव, तुषार भवाळ, अविनाश साबळे, विश्वास पाटोळे, विनोद घाडगे, विजू (लाला) जगधने, नितीन काळे, सोनू काळोखे, प्रशांत साळवे यांच्यासह शिरूर शहर, शिरूर तालुका तसेच पुणे व नगर जिल्ह्यातील हजारो समाजबांधव आणि लहूसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतन साठे यांनी केले, तर लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल उर्फ बंटी जोगदंड यांनी उपस्थितांचे आभार मानले.


विशाल (बंटी) जोगदंड म्हणाले…

“मातंग समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून सामाजिक न्यायासाठी आहे. अन्यायाविरुद्ध लोकशाही मार्गाने निर्णायक लढा उभारला जाईल. समाजाच्या हक्कांवर गदा आणणाऱ्यांना जाब विचारला जाईल. एकजुटीच्या बळावर मातंग समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल. समाजाचा स्वाभिमान अबाधित ठेवत हक्कांसाठी सातत्याने लढत राहू.”


विनोद (पप्पू) साठे म्हणाले…

“मातंग समाजावर होणारा अन्याय आता सहन केला जाणार नाही. समाजाचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी संघटितपणे काम केले जाईल. समाजहित, स्वाभिमान आणि घटनात्मक अधिकारांसाठी सुरू असलेला लढा अधिक व्यापक करण्यात येईल. न्याय्य हक्क मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील. महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने अनुसूचित जाती आरक्षणातील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण तातडीने लागू करून मातंग समाजाला न्याय्य आरक्षणाचा वाटा द्यावा, हीच या भव्य जनआक्रोश मोर्चाची प्रमुख मागणी आहे.”

Previous Post

नालासोपाऱ्यात नाळेसफाई कामांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप; पावसामुळे शहर जलमय

Next Post

पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत २४ तासांत १३ फुटांनी वाढ; कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
16
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
27
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
28
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
15
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
34
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
6
Next Post

पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत २४ तासांत १३ फुटांनी वाढ; कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In