• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत २४ तासांत १३ फुटांनी वाढ; कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 5, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

कोल्हापूर | प्रतिनिधी

कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत अवघ्या २४ तासांत तब्बल १३ फुटांनी वाढ झाल्याने नदीकाठची अनेक मंदिरे पाण्याखाली गेली असून, जिल्ह्यातील पाच बंधारेही जलमय झाले आहेत.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच लघू व मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होत असून, यामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंचगंगा नदीवरील पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

यंदाच्या हंगामात प्रथमच कोल्हापूरातील शिंगणापूर बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे प्रयाग-चिखली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठ्यातही वाढ झाली असून धरण सध्या २१ टक्के भरले आहे.

जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील रुई, इचलकरंजी आणि शिरोळ हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच कासारी नदीवरील यवलूज बंधाराही जलमय झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुसरीकडे, कोयना धरणात ७,५८५ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. मात्र, अद्याप अलमट्टी धरणामध्ये विशेष आवक झालेली नाही. हिप्परगी धरणात सध्या २०० क्युसेकने पाण्याची आवक सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

सततच्या पावसामुळे जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिक यंत्रणा सतर्क असून, नागरिकांनी नदीकाठच्या भागात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

अनुसूचित जाती आरक्षणात ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणाची जोरदार मागणी; शिरूरमध्ये जनआक्रोश मोर्चा

Next Post

तेरवाड बंधारा पाण्याखाली; मळी भागातील नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
16
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
27
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
28
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
15
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
34
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
6
Next Post

तेरवाड बंधारा पाण्याखाली; मळी भागातील नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In