• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तेरवाड बंधारा पाण्याखाली; मळी भागातील नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :-

कुरुंदवाड : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून सतत पडणाऱ्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून अनेक बंधारे पाण्याखाली जाऊ लागले आहेत. यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने पेरण्या, लावण्या आणि मशागती खोळंबल्या होत्या. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे पंचगंगा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा तेरवाड बंधारा शनिवारी सकाळी पाण्याखाली गेला आहे.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

बंधारा पाण्याखाली गेल्याने मळी भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. तसेच नदीपलीकडे शेती असलेल्या शेतकऱ्यांना कुरुंदवाड-शिरढोण पुलाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा लागत आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. यापूर्वीही अनेक बंधारे पाण्याखाली गेले होते. शनिवारी सकाळी तेरवाड बंधाराही जलमय झाला.

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून तेरवाड बंधाऱ्यात अडकून पडलेली जलपर्णी आता पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून पुढे आली असून ती कुरुंदवाड-शिरढोण पुलाला अडकली आहे. तसेच पुलाजवळील गवताच्या कुरणामध्ये मोठ्या प्रमाणात पसरली आहे. त्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याशिवाय कुरणातील गवताचे नुकसान होत असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. ही जलपर्णी लवकरात लवकर वाहून गेल्यास शेतकऱ्यांचे नुकसान टळू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, कुरुंदवाड-शिरोळ जुना रस्ता शुक्रवारी शिरोळ बंधाऱ्यावर पाणी आल्याने बंद करण्यात आला होता. शनिवारी शिवतीर्थजवळील अनवडी पुलावरही नदीचे पाणी आल्याने हा रस्तादेखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत २४ तासांत १३ फुटांनी वाढ; कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली

Next Post

पाथरी येथे थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
12
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
16
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
20
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
71
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
60
Next Post

पाथरी येथे थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In