• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रानडुकरांनी तूर केली फस्त; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 5, 2026
in Blog
0
0
SHARES
31
VIEWS
Ad 1

तेल्हारा प्रतिनिधी

पिवंदळ बु. परिसरातील निंभोरा व तळेगाव डवला शेतशिवारात रानडुकरांच्या कळपाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालत तुरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. रात्रीच्या वेळी शेतात शिरलेल्या रानडुकरांनी पेरणी केलेली तूर फस्त केल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून बळीराजा हतबल झाला आहे.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून जंगलालगतच्या शेतशिवारात रानडुकरांचा वावर वाढला आहे. काल रात्री रानडुकरांच्या मोठ्या कळपाने पिवंदळ बु. परिसरातील अनेक शेतांमध्ये प्रवेश करून तुरीच्या पिकाची नासधूस केली. सकाळी शेतकरी शेतावर गेल्यानंतर त्यांना संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाल्याचे दिसून आले.

महागडी बियाणे, खते आणि मशागतीसाठी कर्ज काढून शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी केली होती. पीक जोमात असल्याने यंदा चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र रानडुकरांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. प्राथमिक अंदाजानुसार परिसरातील शेतकऱ्यांचे एकूण लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेतकरी संदीप गिल्ले म्हणाले, “रात्रभर जागून पिकाची राखण करावी लागते. तरीही डुकरांचे कळप एवढे मोठे असतात की त्यांना पळवून लावणे कठीण जाते. आमचे अतोनात नुकसान झाले आहे.”

या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून वन विभाग व कृषी विभागाने तात्काळ पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

तसेच रानडुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी आर्त मागणीही शेतकरी करत आहेत.

Previous Post

धारासूर येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन संपन्न

Next Post

भूमिपुत्र अमोल चव्हाण यांचे सामाजिक दायित्व; लोहा शहरात ४५० कचराकुंड्यांचे वाटप

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
13
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
26
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
28
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
14
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
33
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
6
Next Post

भूमिपुत्र अमोल चव्हाण यांचे सामाजिक दायित्व; लोहा शहरात ४५० कचराकुंड्यांचे वाटप

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In