• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुख्य बाजारपेठेतील सराफा दुकान फोडण्याचा प्रयत्न; सुरक्षा सायरनमुळे लाखोंची चोरी टळली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in Blog
0
मुख्य बाजारपेठेतील सराफा दुकान फोडण्याचा प्रयत्न; सुरक्षा सायरनमुळे लाखोंची चोरी टळली
0
SHARES
76
VIEWS
Ad 1

जत | प्रतिनिधी

जत शहरातील मध्यवर्ती हनुमान मंदिरासमोरील ‘माही ज्वेलर्स’ या सराफा दुकानात रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरीचा धाडसी प्रयत्न केला. मात्र दुकानात बसविण्यात आलेल्या आधुनिक सुरक्षा सायरनमुळे चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याने लाखो रुपयांचा ऐवज वाचला. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री अडीच ते तीनच्या सुमारास चोरट्यांनी लोखंडी रॉडच्या साहाय्याने दुकानाचे शटर उचकटण्याचा प्रयत्न केला. शटर उघडताच सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होऊन सायरनचा मोठा आवाज झाला. त्यामुळे चोरटे घाबरून तेथून पसार झाले. पहाटे शेजाऱ्यांनी दुकानदाराला माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.

दरम्यान, याच रात्री जत तालुक्यातील मुचंडी गावातही अज्ञात चोरट्यांनी दोन दुकाने फोडून चोरी केल्याची घटना घडली. एकाच रात्री तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

घटनेनंतर व्यापाऱ्यांनी नगरपरिषद आणि स्थानिक प्रशासनावरही नाराजी व्यक्त केली. मारुती चौकातील लोकप्रतिनिधींच्या निधीतून बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक दिवसांपासून बंद असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. कॅमेरे कार्यरत असते तर चोरट्यांचा माग काढणे अधिक सोपे झाले असते, असे मत माही ज्वेलर्सचे मालक मुसाजी याद शेख यांनी व्यक्त केले.

जत शहरातील बाजारपेठ, सराफा गल्ली आणि प्रमुख चौकांमध्ये रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, बंद असलेले सीसीटीव्ही तातडीने सुरू करावेत आणि चोरीच्या घटनांतील आरोपींना लवकरात लवकर अटक करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करावी, अशी मागणी व्यापारी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

शेतकरी अजूनही पीक विम्याच्या प्रतीक्षेत; शासनाच्या विलंबामुळे धाराशिव जिल्ह्यात नाराजी

Next Post

जुन्नरच्या पूर्व भागात मुसळधार पावसाची हजेरी; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
4
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
3
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
11
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
17
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
6
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
211
Next Post

जुन्नरच्या पूर्व भागात मुसळधार पावसाची हजेरी; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In