भिलवडी | प्रतिनिधी
भिलवडी शिक्षण संस्थेच्या आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्राप्त सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तसेच इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूलने पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा–२०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्यात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दोन्ही गटांतील तब्बल २२ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली असून संस्थेने गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
इयत्ता ५ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत एकाच शिक्षण संस्थेचे १२ विद्यार्थी स्थान मिळवत सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर इयत्ता ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सारंग शंतनू कुलकर्णी याने २७२ गुणांसह राज्य ग्रामीण गुणवत्ता यादीत १२ वा क्रमांक मिळवत संस्थेचे नाव राज्यभर उज्ज्वल केले.
इयत्ता ८ वीमध्ये आर्यजीत विनोद पाटील, अनुष्का श्रीकृष्ण जंगम, नक्षत्रा सुदर्शन उपाध्ये, आराध्या प्रमोद डिसले, अन्वेशा प्रदीप खुबीकर, समिक्षा शशिकांत पाटील, ईश्वरी विजय पाटील, स्वरा सचिन आरते आणि मयुरेश संजय मोरे यांनीही गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.
इयत्ता ५ वीमध्ये पालवी प्रशांत शेटे, सार्थक अमोल कोळेकर, युगंधर अजित सलगर, आचल दीपक चौगुले, साहिर वाहिद संदे, आरूष सावणा गडदे, नरेश विनोद हुलवान, राजवीर रोहित गुरव, निधी सुदर्शन उपाध्ये, तनिष्का भास्कर माने, माही आकाश शेटे आणि सानवी सचिन निकम यांनी उल्लेखनीय यश मिळवले.
या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख शंकर केंगार यांच्यासह ज्ञानेश्वर भगरे, राजू आरते, दिग्विजय मोकाशी, पौर्णिमा धेंडे, अश्विनी गुणाले, सुनील भोये, प्रल्हाद पोवार, विद्या रोडे, अविनाश जगताप, प्रविण पलमटे, उज्वला हजारे, अदिती देशपांडे आणि शीलप्रभा किणीकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विश्वासजी चितळे यांनी सर्व २२ गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक सायकल प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. या निर्णयाचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी स्वागत केले.
या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

