• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीरामपूर पोलिसांची तत्पर कारवाई; बीडच्या अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका, तिघांना अटक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in Blog
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

श्रीरामपूर | प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला श्रीरामपूर येथे आणल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी तातडीची कारवाई करत मुलीची सुखरूप सुटका केली. या प्रकरणात मुख्य आरोपीसह त्याच्या दोन नातेवाईकांना अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी त्यांना बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

मिळालेल्या माहितीनुसार, ४ जुलै रोजी नेकनूर (जि. बीड) पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल व्ही. एम. क्षीरसागर व एच. एम. कदम हे तपासाच्या अनुषंगाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आले होते. त्यांनी पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांची भेट घेऊन अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची माहिती दिली तसेच तिचा फोटो पोलिसांना उपलब्ध करून दिला.

आरोपीचा ठावठिकाणा निश्चित नसतानाही श्रीरामपूर शहर पोलिसांनी केवळ मुलीच्या फोटोच्या आधारे शहरभर शोधमोहीम सुरू केली. पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र कातखडे, संपत बडे तसेच अमोल पडोळे, अजित पटारे, अमोल गायकवाड, ज्ञानेश्वर वाघमोडे, सचिन दुकळे, सागर बनसोडे आणि रविंद्र शिंदे यांच्या पथकाने कसून तपास करत संजयनगर (वॉर्ड क्र. १) परिसरातून संशयित आरोपी शुभम नामदेव मिसाळ (वय २२, रा. आगर कानडगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) याला त्याच्या दोन नातेवाईकांसह ताब्यात घेतले.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका केली. त्यानंतर मुख्य आरोपी व त्याच्या दोन नातेवाईकांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी नेकनूर (बीड) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या तत्पर आणि समन्वयपूर्ण कारवाईबद्दल श्रीरामपूर शहर पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

Previous Post

चांदोली धरण परिसरात मुसळधार पावसाची संततधार; २४ तासांत १२८ मिमी, पाथरपुंजमध्ये २१५ मिमी नोंद, कृष्णा नदीवरील ९ बंधारे पाण्याखाली

Next Post

येवला-मनमाड महामार्गावर मुरुमाऐवजी माती; चिखलामुळे प्रवासी आणि वाहनधारक त्रस्त

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
199
Next Post
येवला-मनमाड महामार्गावर मुरुमाऐवजी माती; चिखलामुळे प्रवासी आणि वाहनधारक त्रस्त

येवला-मनमाड महामार्गावर मुरुमाऐवजी माती; चिखलामुळे प्रवासी आणि वाहनधारक त्रस्त

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In