• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 8, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

पालघर | प्रतिनिधी :

जव्हार तालुक्यातील हिरडपाडा आणि सारसून ग्रामपंचायतींना जोडणाऱ्या लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलाची गेल्या २० वर्षांपासूनची मागणी अद्यापही प्रलंबित आहे. २००६ पासून सातत्याने निवेदने आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने संतप्त झालेल्या हिरडपाडा ग्रामस्थांनी आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

पिथोडी-दहाड मार्गावरील लेंडी नदीवर पूल नसल्याने हिरडपाडा व सारसून या दोन्ही ग्रामपंचायतींतील सुमारे ८ हजार नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सारसून ग्रामपंचायतीची सुमारे ४,५०० तर हिरडपाडा ग्रामपंचायतीची सुमारे ३,५०० लोकसंख्या या मार्गावर अवलंबून आहे. पूल नसल्यामुळे नागरिकांना १५ ते २० किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे.

आरोग्य सेवांवरही या समस्येचा गंभीर परिणाम होत असून, गर्भवती महिलांना तसेच आपत्कालीन रुग्णांना वेळेत उपचारासाठी पोहोचविण्यात अडचणी येत आहेत. पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर दोन्ही गावांतील संपर्क पूर्णपणे तुटत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनते.

शिक्षण क्षेत्रालाही या समस्येचा फटका बसत आहे. गगणगीर येथील आश्रमशाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत असून, पावसाळ्यात हा प्रवास धोकादायक ठरत असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांनाही नदीच्या दोन्ही बाजूंना असलेल्या शेतांमध्ये जाणे, शेतीची अवजारे, खत, बियाणे व शेतमालाची वाहतूक करणे तसेच गुरे-ढोरे ने-आण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

या प्रश्नावर हिरडपाडा ग्रामस्थांच्या बैठकीत कल्पेश भोरे, प्रवीण मर्या भोरे, ज्येष्ठ नागरिक जाणू येशू माळी, गंगा येशू माळी यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. हिरडपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती भोरे (माळी) तसेच सारसून ग्रामपंचायतीच्या सरपंच काकडी नवसू जंगली यांनीही पुलाच्या मागणीला पाठिंबा देत शासनाने तातडीने कायमस्वरूपी पुलास मंजुरी द्यावी, अशी मागणी केली.

ग्रामस्थांनी प्रशासनावर दोन दशकांपासून दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, पुलाच्या कामास तातडीने मंजुरी न मिळाल्यास आगामी निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया

भारती भोरे (माळी), सरपंच, हिरडपाडा ग्रामपंचायत :
“गेली २० वर्षे पुलासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. पूल नसल्यामुळे शिक्षण, आरोग्य, दळणवळण आणि शेतीवर गंभीर परिणाम होत आहे. शासनाने तातडीने पुलाच्या कामाला मंजुरी द्यावी. अन्यथा ग्रामस्थांच्या मतदान बहिष्काराच्या भूमिकेची जबाबदारी प्रशासनाची असेल.”

काकडी नवसू जंगली, सरपंच, सारसून ग्रामपंचायत :
“हिरडपाडा ग्रामस्थांची पुलाची मागणी पूर्णपणे रास्त आहे. विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने तातडीने कायमस्वरूपी पुलास मंजुरी द्यावी. सारसून ग्रामपंचायत या मागणीसोबत ठामपणे उभी आहे.”

Previous Post

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार नियोजन व वेळेत कामांना प्राधान्य द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

कोळगावच्या संजना पाटील यांच्या समाजसेवेचे सर्वत्र कौतुक; आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला धाव

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
3
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
3
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
10
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
16
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
6
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
210
Next Post

कोळगावच्या संजना पाटील यांच्या समाजसेवेचे सर्वत्र कौतुक; आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला धाव

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In