• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मोहपाडा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर; ५८ नागरिकांनी घेतला लाभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 8, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

खालापूर | प्रतिनिधी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘क्षयरोग मुक्त भारत – १०० दिवस मोहिमे’ अंतर्गत देवा ग्रुप फाउंडेशन भारत, अष्टविनायक हॉस्पिटल (मोहपाडा, रसायनी), जिल्हा क्षयरोग केंद्र रायगड आणि जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जुलै २०२६ रोजी मोहपाडा उपकेंद्र येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ५८ नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला.

RelatedPosts

मुसळधार पावसात आयुक्त मनीषा खत्री यांची मखमलाबाद-कार्बन नाका परिसराची पाहणी

जेल रोडवरील खड्ड्यात ट्रक अडकला; ५ तास वाहतूक ठप्प, प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप

अनुदान टप्पा वाढीसाठी अधिवेशनात पाठपुरावा; शिक्षक आंदोलनाला आमदार किरणराव सरनाईक यांची भेट

शिबिरात रक्तदाब (BP), रक्तातील साखरेची तपासणी (RBS), ईसीजी (ECG), डॉक्टरांचा सल्ला, क्षयरोगाविषयी जनजागृती तसेच विविध आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तपासणीदरम्यान अधिक उपचारांची आवश्यकता असलेल्या तीन रुग्णांना अष्टविनायक हॉस्पिटल, मोहपाडा (रसायनी) येथे पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अनिकेत मेस्त्री (MJPJAY विभाग, MOD – Manager on Duty) यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्यासमवेत डॉ. ऋतुजा मोठे, स्टाफ नर्स भावना राहुल, स्नेहल कांबळे, करण पाटील तसेच सहाय्यक अशोक उगलमुगले यांनी रुग्ण तपासणी व व्यवस्थापनात मोलाचे योगदान दिले.

तसेच मोहपाडा उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका प्रियांका पाटील, एमपीडब्ल्यू दादासाहेब जगताप तसेच आशा सेविका अपूर्वा जोडे, मंगल वाघमारे आणि सीमा खरीवले यांनीही शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी उल्लेखनीय सहकार्य केले.

आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, क्षयरोगाविषयी जनजागृती करणे आणि आजारांचे वेळेत निदान करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. उपस्थित नागरिकांनी आयोजकांच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन नियमितपणे करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Previous Post

छत्रपती शिवाजी विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते उत्साहात वृक्षारोपण

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘देववृक्ष अभियान’; अनुलोमच्या जनसेवकांची हिरवी जनचळवळ

Related Posts

Blog

मुसळधार पावसात आयुक्त मनीषा खत्री यांची मखमलाबाद-कार्बन नाका परिसराची पाहणी

July 8, 2026
0
Blog

जेल रोडवरील खड्ड्यात ट्रक अडकला; ५ तास वाहतूक ठप्प, प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप

July 8, 2026
0
Blog

अनुदान टप्पा वाढीसाठी अधिवेशनात पाठपुरावा; शिक्षक आंदोलनाला आमदार किरणराव सरनाईक यांची भेट

July 8, 2026
0
Blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘देववृक्ष अभियान’; अनुलोमच्या जनसेवकांची हिरवी जनचळवळ

July 8, 2026
7
Blog

छत्रपती शिवाजी विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते उत्साहात वृक्षारोपण

July 8, 2026
4
Blog

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात आंबेगाव तालुक्यात तहसीलदारांना निवेदन

July 8, 2026
6
Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 'देववृक्ष अभियान'; अनुलोमच्या जनसेवकांची हिरवी जनचळवळ

ताज्या बातम्या

मुसळधार पावसात आयुक्त मनीषा खत्री यांची मखमलाबाद-कार्बन नाका परिसराची पाहणी

July 8, 2026

जेल रोडवरील खड्ड्यात ट्रक अडकला; ५ तास वाहतूक ठप्प, प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप

July 8, 2026

अनुदान टप्पा वाढीसाठी अधिवेशनात पाठपुरावा; शिक्षक आंदोलनाला आमदार किरणराव सरनाईक यांची भेट

July 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In