• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुसळधार पावसात आयुक्त मनीषा खत्री यांची मखमलाबाद-कार्बन नाका परिसराची पाहणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 8, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

नाशिक | प्रतिनिधी :

नाशिक शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी बुधवारी प्रभाग क्रमांक ६ मधील मखमलाबाद आणि कार्बन नाका परिसराची भर पावसात प्रत्यक्ष पाहणी केली. पावसामुळे पाणी साचण्याच्या तक्रारींची दखल घेत त्यांनी घटनास्थळी जाऊन जलनिस्सारण व्यवस्थेचा आढावा घेतला.

RelatedPosts

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

मखमलाबाद आणि कार्बन नाका परिसरात पावसाचे पाणी साचत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आयुक्तांनी पावसातच पायी फिरून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच पाणी साचण्यामागील कारणांची माहिती घेतली.

पाहणीनंतर संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. गाळ, माती व इतर अडथळे त्वरित हटवून पाण्याचा निचरा सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच भविष्यात अशा समस्या पुन्हा निर्माण होऊ नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आखण्याचे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले.

यावेळी आयुक्त मनीषा खत्री म्हणाल्या, “पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास कमी करणे ही महापालिका प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. समस्या समोर आल्यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही करणे आणि भविष्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यावर प्रशासनाचा भर आहे.”

महापालिका प्रशासनाकडून शहरातील संवेदनशील भागांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, पावसामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्यात येत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

Tags: Rahul Gade
Previous Post

जेल रोडवरील खड्ड्यात ट्रक अडकला; ५ तास वाहतूक ठप्प, प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप

Next Post

दोडामार्गात गोवा बनावटीच्या अवैध दारूवर पोलिसांची धडक कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

Related Posts

Blog

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
4
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन
Blog

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
2
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺
Blog

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026
3
जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा;८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा
Blog

जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा;८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा

October 7, 2026
4
अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल
Blog

अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल

October 7, 2026
10
नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!
Blog

नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!

October 7, 2026
4
Next Post

दोडामार्गात गोवा बनावटीच्या अवैध दारूवर पोलिसांची धडक कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In