• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जेल रोडवरील खड्ड्यात ट्रक अडकला; ५ तास वाहतूक ठप्प, प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 8, 2026
in Blog
0
0
SHARES
100
VIEWS
Ad 1

नाशिक | प्रतिनिधी :

नाशिकमधील जेल रोडवरील पुलावर मंगळवारी पहाटे एका धोकादायक खड्ड्यात अवजड मालवाहतूक ट्रक अडकल्याने जेल रोड ते नांदूर नाका दरम्यानची वाहतूक तब्बल पाच तास ठप्प झाली. या घटनेमुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

RelatedPosts

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

निलकंठेश्वर मंदिरासमोरील कुंभमेळा कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात हा ट्रक अडकला होता. पोलिसांनी तीन जेसीबी आणि एका हायवा वाहनाच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली.

दरम्यान, जेल रोड, नांदूर नाका आणि नाशिक रोड परिसरातील रस्त्यांची दुरवस्था तसेच कुंभमेळ्याच्या कामासाठी खोदलेले खड्डे अद्यापही कायम असल्याने नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कामे रखडल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी व अपघात घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या चार दिवसांत याच धोकादायक खड्ड्यात अनेक वाहने अडकली असून रविवारी एक पिकअप वाहनही त्यात अडकले होते. पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.

नाशिक शहरातील कुंभमेळा विकासकामांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असले तरी त्यानंतर सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि रस्त्यांची दुरुस्ती वेळेत होत नसल्याने नागरिकांनी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी त्वरित दखल घेऊन रस्ते सुरक्षित करावेत, अशी मागणी केली आहे.

Tags: Rahul Gade
Previous Post

अनुदान टप्पा वाढीसाठी अधिवेशनात पाठपुरावा; शिक्षक आंदोलनाला आमदार किरणराव सरनाईक यांची भेट

Next Post

मुसळधार पावसात आयुक्त मनीषा खत्री यांची मखमलाबाद-कार्बन नाका परिसराची पाहणी

Related Posts

Blog

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
4
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन
Blog

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
2
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺
Blog

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026
3
जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा;८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा
Blog

जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा;८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा

October 7, 2026
4
अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल
Blog

अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल

October 7, 2026
10
नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!
Blog

नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!

October 7, 2026
4
Next Post

मुसळधार पावसात आयुक्त मनीषा खत्री यांची मखमलाबाद-कार्बन नाका परिसराची पाहणी

ताज्या बातम्या

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In