• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल

Pratik Tidke by Pratik Tidke
October 7, 2026
in Blog
0
अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

पारगाव ते मलठण रस्त्यावर निकृष्ट कामाचा आरोप; चौकशीसह सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी
शिरूर : हायब्रीड अॅन्युईटी मॉडेलअंतर्गत अष्टविनायक महामार्गाच्या पारगाव ते मलठण या मार्गावरील रस्त्याचे देखभाल व दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. या कामाच्या दर्जाबाबत स्थानिक ग्रामस्थांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, रस्त्यावर डांबरीकरणाऐवजी केवळ काळे साहित्य टाकून डांबरीकरण झाल्याचे दाखविले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या रस्त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी बेल्हेकर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था सुधारण्याऐवजी केवळ काळे साहित्य टाकून काम पूर्ण झाल्याचे दाखविले जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे शासनाच्या निधीचा योग्य वापर होत आहे का, कामाचा दर्जा कोणत्या निकषांनुसार तपासला जात आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

RelatedPosts

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

रस्त्याचे काम सुरू असताना वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले काम सुरू असल्याचे फलक, एकेरी वाहतुकीचे दिशादर्शक फलक तसेच सुरक्षा व्यवस्था पुरेशा प्रमाणात दिसून येत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
तसेच या मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी स्पीडब्रेकर बसविण्यात यावेत, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विशेषतः वस्ती, शाळा, बाजारपेठ, चौक तसेच नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी वाहतुकीचा वेग नियंत्रित करण्यासाठी योग्य नियोजन करून स्पीडब्रेकर बसविण्यात यावेत, अशी मागणी आहे.

रस्त्याच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्यास संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून कामाची गुणवत्ता तपासावी. कामात त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदाराला आवश्यक सूचना देऊन नियम व निकषांनुसार दर्जेदार काम करून घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
केवळ रस्त्यावर काळे साहित्य टाकून काम पूर्ण झाल्याचे दाखविण्याऐवजी प्रत्यक्षात टिकाऊ व दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे. तसेच कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा फलक, एकेरी वाहतुकीचे नियोजन, योग्य दिशादर्शक फलक आणि आवश्यक त्या ठिकाणी स्पीडब्रेकर बसविण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
या संपूर्ण कामाची संबंधित विभागाने तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि काम पारदर्शक पद्धतीने व गुणवत्तेच्या निकषांनुसार करून घ्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Previous Post

नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!

Next Post

जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा;८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा

Related Posts

Blog

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
3
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन
Blog

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
0
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺
Blog

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026
2

परभणीतून ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात; दुष्काळग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

ताज्या बातम्या

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In