प्रतिनिधी : शेख मोईन
किनवट:माजी जिल्हा परिषद सदस्या तथा किनवट नगरपालिकेच्या लोकनियुक्त विद्यमान नगराध्यक्ष सौ. सुजाताताई विनोद एंड्रलवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून किनवट शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप शिवलीला ताई पाटील यांच्या कीर्तनाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना (उबाठा) पक्षाने केले आहे.
गुरुवारी, दि. ०८ ऑक्टोबर २०२६ रोज गुरुवारी सायं ७ ते १० या वेळेत संत श्री गजानन महाराज मंदिर मंगल कार्यालय, किनवट येथे हा सोहळा पार पडणार आहे.या सोहळ्यात महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा कीर्तनकार ह.भ.प. शिवलीलाताई पाटील आपल्या ओघवत्या आणि अभ्यासपूर्ण शैलीत भक्तीमय कीर्तन सेवा सादर करतील. कीर्तन सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या बेबीताई नाईक राहणार असून, उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबादादा खराटे यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून कपिलभाऊ नाईक, माहूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, समाधान जाधव, उपनगराध्यक्ष हसन लाला, काँग्रेसचे नेते माधव रेड्डी सौ नंदिनीताई टारपे, प्रकाश गब्बा राठोड,जनाबाई डुडुळे यांच्यासह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनेचे नेते,स्थानिक नगरपालिकेचे सभापती, उपसभापती व सर्व नगरसेवक प्रमुख उपस्थिती दर्शवणार आहेत.
या भक्तिमय सोहळ्याचे आयोजन शिवसेना शहरप्रमुख तथा स्वीकृत नगरसेवक प्रशांत सुरेशराव कोरडे यांच्या वतीने करण्यात आले आहे. तरी किनवट शहर व परिसरातील सर्व नागरिकांनी आणि भाविकांनी या कीर्तन सोहळ्यास उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख मारोती दिवसे पाटील माजी शहरप्रमुख संतोष येलचलवार,युवा सेना तालुकाप्रमुख अतुल दर्शनवाड तसेच युवानेते करण एंड्रलवार मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.









