• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अंगणवाडी सेविकांची दगदग थांबेना; अद्ययावत साधने व प्रशिक्षणाची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in Blog
0
0
SHARES
91
VIEWS
Ad 1
Ad 1

लोहारा | प्रतिनिधी

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध महिला व बालकल्याण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अपुऱ्या तांत्रिक सुविधांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. अद्ययावत मोबाईल, तांत्रिक सुविधा आणि वेळेवर प्रशिक्षण मिळावे, अशी मागणी अंगणवाडी सेविकांकडून सातत्याने केली जात आहे.

गावागावांतील अंगणवाडी केंद्रांमार्फत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, मिशन शक्ती, अंगणवाडी सेवा आणि मिशन वात्सल्य यांसारख्या महत्त्वाच्या योजना राबविल्या जातात. गर्भवती व स्तनदा मातांना आर्थिक मदत, महिला सक्षमीकरण, बालकांना पूरक पोषण आहार तसेच अनाथ व निराधार बालकांच्या संगोपनासाठी या योजनांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

मात्र, या योजनांची ऑनलाइन नोंदणी आणि अहवाल सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले मोबाईल आणि तांत्रिक साधने कालबाह्य ठरत असल्याचे सांगितले जात आहे. अनेक ठिकाणी इंटरनेटची समस्या, वारंवार बदलणारी ऑनलाइन प्रणाली आणि त्याबाबत वेळेवर प्रशिक्षण न मिळाल्याने माहिती भरताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.

परिणामी, अनेक लाभार्थ्यांच्या नोंदी आणि कागदपत्रे वेळेत अपलोड होत नसल्याने योजनांचा लाभ मिळण्यास विलंब होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

अंगणवाडी सेविकांनी शासनाकडे अद्ययावत मोबाईल, सक्षम तांत्रिक सुविधा आणि नियमित प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन महिला व बालकांना वेळेत लाभ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Ad 1
Previous Post

जिल्ह्यात सर्वाधिक १४१.४ मिमी पावसाची नोंद तेल्हारा तालुक्यात; निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकरी चिंतेत

Next Post

राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात प्रेरणादायी व्याख्यान

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
269
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
22
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
17
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
35
Next Post
राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात प्रेरणादायी व्याख्यान

राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात प्रेरणादायी व्याख्यान

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In