• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोगस शालार्थ आय.डी. घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
बोगस शालार्थ आय.डी. घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी
0
SHARES
56
VIEWS
Ad 1
Ad 1

विनाअनुदानित शिक्षकांना प्रथम न्याय, त्यानंतरच नवीन शिक्षक भरती – शिक्षकांची शासनाकडे मागणी

प्रतिनिधी | मुंबई

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

राज्यातील कथित बोगस शालार्थ आय.डी. प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच शासनाच्या निधीचा अपहार झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली करण्यात यावी, अशी मागणी राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांनी शासनाकडे केली आहे.

शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठ ते दहा वर्षांपासून हजारो शिक्षक विनाअनुदानित शाळांमध्ये कोणतेही वेतन न घेता नियमितपणे विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची सेवा अखंड सुरू ठेवली असून, संबंधित शिक्षण अधिकारी, शिक्षण विभाग आणि लोकप्रतिनिधींना याची माहिती असूनही त्यांच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.

अनेक शिक्षकांनी न्याय मिळावा म्हणून न्यायालयाचे दार ठोठावले असले तरी आजही त्यांना वैयक्तिक मान्यता, वेतन किंवा सेवेचे संरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेक शिक्षक वयोमर्यादा ओलांडल्याने इतर रोजगाराच्या संधींपासूनही वंचित राहिल्याचे त्यांनी सांगितले. तरीही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या भावनेतून ते आजही निष्ठेने अध्यापन करत असल्याचे शिक्षकांनी नमूद केले.

शासनाने सर्वप्रथम अनेक वर्षांपासून विनावेतन सेवा देणाऱ्या पात्र विनाअनुदानित शिक्षकांची वरिष्ठतेनुसार (सिनिअरिटी) यादी तयार करून त्यांच्या सेवेची अधिकृत नोंद घ्यावी. त्यानंतर त्यांना कायमस्वरूपी मान्यता, वेतन अथवा योग्य मानधन देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.

यासोबतच कथित बोगस शालार्थ आय.डी. प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी आणि शासनाच्या तिजोरीचे झालेले नुकसान संबंधितांकडून वसूल करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

अनेक वर्षांपासून विनावेतन सेवा बजावणाऱ्या शिक्षकांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेपर्यंत पोर्टलमार्फत नवीन शिक्षक भरती प्रक्रिया राबवू नये, अशी ठाम भूमिका शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटना आणि कर्मचारी संघटनांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून या गंभीर प्रश्नावर एकत्रितपणे शासनाकडे प्रभावी पाठपुरावा करावा आणि अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा, अशी आर्त मागणी संबंधित शिक्षकांकडून करण्यात आली आहे.

Ad 1
Tags: Amar Pathare
Previous Post

दिघोळमध्ये श्री संत एकनाथ महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत; वारकऱ्यांसाठी महाप्रसाद व नाश्त्याची व्यवस्था

Next Post

निलंगा नगर परिषदेतील अपूर्ण रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा; आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचे निर्देश

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

निलंगा नगर परिषदेतील अपूर्ण रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा; आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचे निर्देश

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In