• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भावली धरण परिसरातील पर्यटकांवरील हल्लाप्रकरणी नऊ आरोपी जेरबंद; एक सराईत गुन्हेगार, एकाचा शोध सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in क्राईम
0
0
SHARES
16
VIEWS
Ad 1
Ad 1

नाशिक प्रतिनिधी

RelatedPosts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

इगतपुरी तालुक्यातील भावली धरण व धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबावर हल्ला करून त्यांच्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी नऊ संशयितांना ताब्यात घेतले असून, एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. अटकेत असलेल्या आरोपींपैकी एकावर यापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

या कारवाईची माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मुसळधार पावसानंतर भावली धरण परिसरात पर्यटनासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी नाशिकमधील एक कुटुंब फिरण्यासाठी आले असताना काही तरुणांनी महिलांची छेड काढल्याचा आरोप आहे. याचा जाब विचारल्यानंतर संबंधित कुटुंबासोबत धक्काबुक्की करण्यात आली. घाबरलेल्या कुटुंबाने तेथून कारने निघण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपींनी सुमारे १० ते १२ किलोमीटरपर्यंत पाठलाग करत त्यांच्या वाहनावर हल्ला करून काचा फोडल्या व मोठी तोडफोड केली.

घटनेनंतर पीडित कुटुंब थेट नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर हा गुन्हा इगतपुरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या प्रकरणी हत्येचा प्रयत्न, दरोडा, विनयभंग आदी गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही आणि व्हिडिओ फुटेजच्या आधारे तपास करून आतापर्यंत नऊ संशयितांना ताब्यात घेतले आहे. हे संशयित इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो, बलायदुरी, देवळे, घोटी, माणिकखांब, गिरणारे आदी गावांतील असून ते एकमेकांच्या परिचयातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी सांगितले की, तक्रारदारांनी सुरुवातीला सात ते आठ संशयितांविरोधात तक्रार दिली होती. मात्र तपासादरम्यान आरोपींना मदत करणारे, आश्रय देणारे तसेच पळून जाण्यास सहाय्य करणाऱ्यांचाही शोध घेऊन त्यांना गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, एका फरार आरोपीचा भिवंडी-वाडा परिसरात शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक ग्रामीण पोलीस करत आहेत.

Ad 1
Tags: Rahul Gade
Previous Post

नाशिकच्या श्रावणी सांगळेची आशियाई स्पर्धेत तिहेरी पदकांची कमाई; दोन सुवर्ण, एक कांस्य जिंकून जिल्ह्याचा गौरव

Next Post

एसटीच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त दोंडाईचा बस आगारात वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Related Posts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप
क्राईम

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

October 2, 2026
115
क्राईम

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

September 27, 2026
94
ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 14, 2026
20
“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”
क्राईम

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

August 14, 2026
12
राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा
क्राईम

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

August 13, 2026
110
क्राईम

सासऱ्याकडून जावयाची कुऱ्हाडीने हत्या; कौटुंबिक वादाचे रक्तरंजित पर्यवसान

July 16, 2026
12
Next Post

एसटीच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त दोंडाईचा बस आगारात वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In