• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वनजमिनीवरील रहिवाशांना मालकी हक्काचे पट्टे द्या; शिवसेना ओबीसी विभागाची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 16, 2026
in Blog
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1
Ad 1

कोंढाळी | प्रतिनिधी

कोंढाळी नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १५ व १६ मध्ये वन विभागाच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या पात्र कुटुंबांना वनहक्क कायदा २००६ अंतर्गत मालकी हक्काचे पट्टे मंजूर करण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना ओबीसी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

यासंदर्भात कोंढाळी नगरपंचायत, काटोल तहसीलदार तसेच वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन शिवसेना ओबीसी विभाग कोंढाळी शहर प्रमुख सचिन भारसकरे यांच्या शीर्षकपत्रावर नागपूर जिल्हा समन्वयक अमोल तांदुळकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक १५ व १६ मधील अनेक कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासून वनजमिनीवर घरे बांधून राहत आहेत. मात्र, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ अंतर्गत पात्र असूनही अनेक नागरिकांना अद्याप मालकी हक्काचे पट्टे मंजूर झालेले नाहीत.

पट्टे मंजूर नसल्यामुळे नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल योजना, वीज, पाणी, बँक कर्ज तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पात्र नागरिकांचे वनहक्क दावे निकाली काढावेत व वनहक्क कायदा २००६ नुसार मालकी हक्काचे पट्टे मंजूर करावेत, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी शिवसेना काटोल तालुका सहसंघटक संदीप कळसे उपस्थित होते.

— प्रतिनिधी, सारथी महाराष्ट्राचा न्यूज

Ad 1
Previous Post

ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; कडवे खुर्दमध्ये शेतात पावसाचे पाणी साचले

Next Post

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे हे माझे कर्तव्य – महेंद्रशेठ घरत

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
31
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
16
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
15
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
45
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे हे माझे कर्तव्य – महेंद्रशेठ घरत

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In