• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एसटीचे भाडे वाढले; पण स्थानकांवरील समस्यांचे काय? – पत्रकार भारत कवितके यांचा सवाल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
0
SHARES
23
VIEWS
Ad 1
Ad 1

मुंबई (कांदिवली पश्चिम) | प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाने १७ जुलै २०२६ पासून एसटीच्या प्रवासी भाड्यात वाढ केली असली, तरी राज्यभरातील एसटी स्थानकांवरील मूलभूत सुविधांचा प्रश्न अद्यापही कायम असल्याचे मत पत्रकार भारत कवितके यांनी व्यक्त केले आहे. भाडेवाढीबरोबरच प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

RelatedPosts

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

कानळदा-जळगाव रस्त्यावर बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; डंपरसह ५.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

भारत कवितके यांनी सांगितले की, अनेक एसटी स्थानकांवर शौचालयांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था, शेड व पंख्यांची कमतरता, खराब डांबरीकरण, तसेच नियंत्रण कक्षातील कर्कश ध्वनीप्रणाली यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय स्थानक परिसरात भिकारी, गर्दुल्ले, दारूच्या नशेत असणारे आणि बेवारस व्यक्तींचा वावर वाढल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

पंढरपूर येथील एसटी स्थानकाचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, स्थानक परिसरात प्रवाशांपेक्षा भिकारी व बेवारस व्यक्तींची संख्या अधिक दिसून येते. त्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठीही जागा मिळत नाही. तसेच नॅन्सी कॉलनी एसटी स्थानकावरील शौचालयांची अवस्था अत्यंत खराब असून दरवाजे तुटलेले, नळांना पाणी नसणे आणि परिसरात डांबरीकरणाचा अभाव असल्याने विशेषतः पावसाळ्यात प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

शौचालय ठेकेदारांकडून महिला व पुरुष प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने शुल्क आकारले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. याबाबत अनेकदा बातम्या प्रसिद्ध करून महामंडळाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असला, तरी अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे त्यांनी नमूद केले.

याशिवाय काही एसटी स्थानकांवरील उपाहारगृहे बंद असल्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. नातेपुते येथे रात्री थांबणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांना चहा आणि मिसळपाव व्यतिरिक्त इतर खाद्यपदार्थ उपलब्ध नसल्याची तक्रार आहे. तर पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील मॉल परिसरात गाड्या थांबत असल्या, तरी तेथील खाद्यपदार्थांच्या जास्त दरामुळे प्रवासी खरेदी करण्यास टाळाटाळ करतात.

सोलापूर एसटी स्थानकात जागेअभावी बस लावताना व बाहेर काढताना चालक आणि वाहकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

“भाडेवाढ झाली, पण त्याच प्रमाणात प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळणार का? स्थानकांवरील मूलभूत समस्या कधी दूर होणार?” असा सवाल पत्रकार भारत कवितके यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे उपस्थित केला आहे.

Ad 1
Tags: Bharat kavitake
Previous Post

निमगव्हाणच्या ऋषिराज बाविस्करचे NEET-2026 मध्ये यश; पहिल्याच प्रयत्नात मिळवले 206 गुण

Next Post

नातेपुते येथे माऊलींच्या पालखीचे भक्तिमय वातावरणात आगमन; वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Related Posts

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.
Blog

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

October 18, 2026
0
माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 18, 2026
5
Blog

कानळदा-जळगाव रस्त्यावर बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; डंपरसह ५.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 18, 2026
4

October 16, 2026
55
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
35
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
84
Next Post

नातेपुते येथे माऊलींच्या पालखीचे भक्तिमय वातावरणात आगमन; वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

ताज्या बातम्या

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

October 18, 2026
माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 18, 2026

कानळदा-जळगाव रस्त्यावर बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; डंपरसह ५.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In