• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तेरवाड (गंगापूर) येथे शॉर्टसर्किटमुळे घराला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 23, 2026
in Blog
0
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज | कुरुंदवाड | प्रतिनिधी

शिरोळ तालुक्यातील तेरवाड (गंगापूर) येथे बुधवारी (दि. २२ जुलै) दुपारी शॉर्टसर्किटमुळे आयुब युसूफ बेपारी यांच्या घराला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीत मुलीच्या प्रसूतीसाठी ठेवलेली सुमारे ९० हजार रुपयांची रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने तसेच संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

RelatedPosts

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास घरातील बेडरूममधील विद्युत वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. काही क्षणांतच धुराचे लोट संपूर्ण घरात पसरले. आरडाओरड ऐकून सामाजिक कार्यकर्ते इरफान बेपारी, स्वप्नील शिंदे, फारूक बेपारी, आदर्श उगळे, पंकज म्हावळे, विकास आवळे, सूरज उगळे यांच्यासह ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वेगाने पसरल्याने कुरुंदवाड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

अग्निशमन दलाचे नितीन संकपाळ आणि हेमंत वायचळ यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत गॅस सिलेंडर सुरक्षित बाहेर काढला. त्यानंतर छताचे पत्रे फोडून पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. त्यामुळे आग आणखी पसरण्याचा धोका टळला.

घटनेनंतर तेरवाडचे तलाठी एस. एस. खोत यांनी पंचनामा केला. तसेच ग्रामपंचायत अधिकारी संजय पुकाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, माजी सरपंच संजय अनुसे आणि पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Previous Post

कुरुंदवाड नगरपरिषदेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

Next Post

शाहूवाडी-पन्हाळ्यातील ४ हजार हेक्टर क्षेत्राला बंदिस्त पाईपलाईनद्वारे सिंचनाचा दिलासा; आमदार डॉ. विनय कोरे यांची पाहणी

Related Posts

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा
Blog

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

September 10, 2026
9
Blog

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

September 10, 2026
17
Blog

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026
42
Blog

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026
14
Blog

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

September 10, 2026
4
Blog

दक्षिण रायगड भाजप महिला मोर्चाची जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धा उत्साहात

September 10, 2026
4
Next Post

शाहूवाडी-पन्हाळ्यातील ४ हजार हेक्टर क्षेत्राला बंदिस्त पाईपलाईनद्वारे सिंचनाचा दिलासा; आमदार डॉ. विनय कोरे यांची पाहणी

ताज्या बातम्या

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

September 10, 2026

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In