• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ब्रम्हपुरीत काँग्रेसचा आक्रमक एल्गार; रास्ता रोको, धरणे आंदोलनाने शहर ठप्प

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 23, 2026
in Blog
0
0
SHARES
40
VIEWS
Ad 1

ब्रम्हपुरी. | २३ जुलै २०२६

शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदी, NEET परीक्षा प्रकरणातील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांवरील अन्याय तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी ब्रम्हपुरीत तीव्र आंदोलन करण्यात आले.

RelatedPosts

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

रास्ता रोको, धरणे आंदोलन, ब्रम्हपुरी बंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन तसेच दोन आंदोलनकर्त्यांनी केलेल्या मुंडणामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले.

सकाळपासून अनेक व्यापारी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली. काही शाळा व महाविद्यालयांनीही बंदला प्रतिसाद दिल्याने शहरातील व्यवहारांवर परिणाम झाला. दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवा दल व विविध आघाड्यांचे शेकडो कार्यकर्ते एकत्र येत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ख्रिस्तानंद चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची तिरडी नेण्यात आली. ख्रिस्तानंद चौकात या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान विनोद झोडगे आणि रवी मैंद यांनी निषेध म्हणून सार्वजनिकरित्या मुंडण केले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा प्रतीकात्मक निषेध असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

यानंतर ख्रिस्तानंद चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत काही प्रमुख आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये खेमराज तिडके, योगेश मिसार, प्रमोद चिमुरकर, राजेश कांबळे, हितेंद्र राऊत, मोंटु पिलारे, मुकुंदा राऊत, विनोद झोडगे, अमित कन्नाके आणि नरेंद्र गाडगीलवार यांचा समावेश होता.

आंदोलनादरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी NEET परीक्षा प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, विद्यार्थ्यांना न्याय आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Previous Post

जामखेडचा सुपुत्र ओंकार मते महाराष्ट्र सुरक्षा बलात दाखल; दौंड येथे प्रशिक्षण यशस्वी पूर्ण

Next Post

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर करमाळा बंदला राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट)चा पाठिंबा

Related Posts

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा
Blog

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

September 10, 2026
8
Blog

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

September 10, 2026
17
Blog

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026
42
Blog

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026
14
Blog

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

September 10, 2026
4
Blog

दक्षिण रायगड भाजप महिला मोर्चाची जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धा उत्साहात

September 10, 2026
4
Next Post

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर करमाळा बंदला राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट)चा पाठिंबा

ताज्या बातम्या

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

September 10, 2026

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In