• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिद्दीची प्रेरणादायी वाटचाल थांबली; संस्कृती घरत (सोनू) यांचे दुःखद निधन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 23, 2026
in Blog
0
0
SHARES
28
VIEWS
Ad 1
Ad 1

खारपाडा (पेण) | प्रतिनिधी :

खारपाडा येथील श्री. भालचंद्र मंगळ्या घरत यांच्या कन्या कै. संस्कृती भालचंद्र घरत (सोनू) यांचे मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या अवघ्या १८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने घरत कुटुंबासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

RelatedPosts

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन दोन वर्षांसाठी बंद; १ नोव्हेंबरपासून वाहतुकीत मोठे बदल

माणुसकीचे नाते जपूया, दुष्काळग्रस्तांना मदत करूया : अमोल भागवत

जन्मतःच दोन्ही डोळ्यांनी दिसत नसतानाही संस्कृती यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर जीवनात अनेक आव्हानांवर मात केली. त्यांनी डोंबिवली येथील स्नेहांकित हेल्पलाइन संस्थेत ब्रेल लिपीचे शिक्षण घेतले आणि नरेंद्र कॉन्व्हेंट हायस्कूलमधून बारावी (वाणिज्य शाखा) परीक्षेत ५७ टक्के गुण मिळवत आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली.

संस्कृती यांना गायनाची विशेष आवड होती. ओळखीच्या व्यक्तींना केवळ त्यांच्या आवाजावरून आणि हालचालींवरून ओळखण्याची विलक्षण क्षमता त्यांच्यात होती. त्यांचा प्रेमळ, मनमिळावू आणि सकारात्मक स्वभाव सर्वांना आपलासा वाटायचा. शारीरिक मर्यादा कधीही कमकुवतपणा न मानता त्यांनी जिद्दीने जीवन जगत अनेकांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पश्चात वडील भालचंद्र मंगळ्या घरत, आई वृषाली भालचंद्र घरत, भाऊ रुद्रांश भालचंद्र घरत, काका रामशेठ मंगळ्या घरत, काकू सुरेखा रामशेठ घरत तसेच अन्य नातेवाईक असा परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारावेळी आप्तेष्ट, नातेवाईक तसेच अध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

दशक्रिया विधी गुरुवार, दि. ३० जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र नाशिक येथे होणार असून, उत्तरकार्य (तेरावा) रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांच्या राहत्या घरी खारपाडा, पेण येथे संपन्न होणार आहे.

संस्कृती घरत यांची संघर्षमय, प्रेरणादायी आणि सकारात्मक जीवनयात्रा अनेकांच्या स्मरणात कायम राहील. त्यांच्या निधनाने एक जिद्दी, गुणी आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली.

Ad 1
Previous Post

२२ जुलै १९४७ : भारतीय तिरंगा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला; भारताच्या इतिहासातील सुवर्णक्षण

Next Post

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

Related Posts

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न
Blog

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

November 1, 2026
6
घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन दोन वर्षांसाठी बंद; १ नोव्हेंबरपासून वाहतुकीत मोठे बदल
Blog

घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन दोन वर्षांसाठी बंद; १ नोव्हेंबरपासून वाहतुकीत मोठे बदल

November 1, 2026
15
माणुसकीचे नाते जपूया, दुष्काळग्रस्तांना मदत करूया : अमोल भागवत
Blog

माणुसकीचे नाते जपूया, दुष्काळग्रस्तांना मदत करूया : अमोल भागवत

October 31, 2026
31
शासकीय योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी अनुमोल ग्रुपची तहसीलदारांशी सदिच्छा भेट
Blog

शासकीय योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी अनुमोल ग्रुपची तहसीलदारांशी सदिच्छा भेट

October 31, 2026
14
पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!
Blog

पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!

October 30, 2026
13
धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव
Blog

धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव

October 29, 2026
4
Next Post

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

ताज्या बातम्या

मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा

मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा

November 3, 2026
पत्रकार भारत कवितके यांना ‘महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर

पत्रकार भारत कवितके यांना ‘महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर

November 3, 2026
कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

November 1, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In