किनवट : प्रतिनिधी
माजी आमदार भीमराव जी. केराम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त किनवट येथे विविध आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून कलावती गार्डन, किनवट येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, मोफत रक्त तपासणी आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी दवाखान्यात ये-जा करण्यासाठी मोफत बससेवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या आरोग्य शिबिराचा परिसरातील नागरिकांनी व गरजू रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवेचा हा उपक्रम राबविण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.








