संजय फलके ,शिरूर तालुका प्रतिनिधी
*शिरूर :* शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श लिपिक पुरस्कार श्री. पांडुरंग विद्यामंदिर या विद्यालयाचे जेष्ठ लिपिक श्री. विठ्ठल गवारे सर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्या वतीने जिल्हास्तरीय पुरस्काराच्या वितरणाचा कार्यक्रम शिरूर येथील विद्याधाम प्रशाला सभागृहात संपन्न झाला.
शिक्षक आमदार मा. जयंत आसगावकर, शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, माजी आमदार सूर्यकांत काका पलांडे, भगवान साळुंके यांच्या प्रमूख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती मा. अरविंद दादा ढमढेरे, संस्थेचे सचिव नंदकुमार निकम सर, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष तुकाराम बेनके सर, संघाचे सचिव,श्री. मारुती कदम सर, शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष गुलाबराव गवळे, कार्यवाह महेश शेलार, मुख्याध्यापक, भाऊसाहेब वाघ सर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे प्रवक्ते दादासाहेब गवारे सर उपस्थित होते.
Discussion about this post