
दिव्य कला मेळा 2024 हा भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाचा दिव्यांग व्यक्तींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आयोजित केलेला कार्यक्रम आहे. या मेळ्यात दिव्यांग उद्योजक आणि कारागिरांची उत्पादने आणि कलाकुसरीचे प्रदर्शन केले जाते. दिव्य कला मेळाव्याच्या माध्यमातून दिव्यांगांना ‘दिव्य कला शक्ती’ रोजगार मेळावा आणि कर्ज मेळाव्याद्वारे सक्षम केले जाते. या मेळ्यात सहभागींना कर्ज मेळाव्यासारख्या उपक्रमातून आर्थिक मदत केली जाते.
दिव्य कला मेला 2024 या कार्यक्रमाचा लाभ पुणे जिल्हा.महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्ती ना व्हावा यासाठी पुणे येथील नवी सांगवी पीडब्ल्यूडी ग्राउंड वर दिनांक 28 सप्टेंबर ते 6 आक्टोबर सुरू आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांच्या हस्ते झाले आहे.
ज्या उद्देशाने हा कार्यक्रम घेतला जात आहे तो उद्देश मात्र सफल होताना दिसत नाही. पुणे जिल्ह्यात एक लाखापेक्षा जास्त दिव्यांग व्यक्ती आहे. परंतु त्यांना या कार्यक्रमाची माहितीच नसल्यामुळे. त्यांना या कार्यक्रमाचा लाभ घेता येत नाही ते या कार्यक्रम पासून वंचित राहिलेले आहे.
याला सर्वस्वी जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरघंटीवार जबाबदार आहे. त्यांनी या कार्यक्रमाचा प्रसार माहिती जिल्ह्यातील सर्वसामान्य खेड्यापाड्यातील दिव्यांगांपर्यंत पोहोचवली नाही.
कार्यक्रमास गर्दी दिसावी यासाठी मात्र पुणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या दिव्यांग शाळा कर्मशाळा यांचे शिक्षक कर्मचारी यांना मात्र लेखी पत्र काढून कार्यक्रमात उपस्थित राहण्याबाबत समाज कल्याण अधिकारी यांनी सांगितलेले आहे.
दिव्यांगांना न्याय देण्यासाठी असलेले महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग कल्याण कार्यालयाचे आयुक्त प्रवीण पुरी हे पुण्यात असूनही ते याकडे दुर्लक्ष करत आहे. याबाबत दिव्यांगामध्ये तीव्र नाराजी आहे
त्यामुळे संतप्त झालेल्या दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी धर्मेंद्र सातव पाटील व अनिता कदम यांनी कार्यक्रम स्थळी येऊन कार्यक्रमास उपस्थित असलेले भारत सरकार सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल. यांची भेट घेऊन त्यांच्यासमोरच दिव्यांग कल्याण आयुक्त महाराष्ट्र प्रवीण पुरी व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचा जाहीर निषेध करून आपली नाराजी व्यक्त केली.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी लवकरच दिव्यांग संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे असे जिल्हाध्यक्ष अनिताताई कदम यांनी सांगितले.
Discussion about this post