• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नाम घेणाऱ्याच्या मागेपुढे मी उभा आहे.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 15, 2026
in Blog
0
नाम घेणाऱ्याच्या मागेपुढे मी उभा आहे.
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

ह भ प श्री दिलीप पाटील महाराष्ट्र राज्य वारकरी मंच सांगली जिल्हा अध्यक्ष

RelatedPosts

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

गूढ शोधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते. कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात. ते कुठून येतात हे कळत नाही. म्हणजे, केवळ दृश्यामध्ये असणाऱ्या गोष्टींचेदेखील मूळ आपल्याला उकलत नाही; मग जे अदृश्यच आहे त्याचे मूळ आपल्याला कसे कळणार ? मी बोलतो कसा, माझे मन कुठून येते, हे देहबुद्धीत राहणाऱ्यांना कळणे कठीण आहे. नामामध्ये जे स्वत:ला विसरले त्यांनाच मी खरा कळलो. स्वत:च्या प्रपंचाचे कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता. पण कोळसा जितका जास्त उगाळावा तितका तो काळाच होत जातो, त्याप्रमाणे प्रपंचामध्ये कसेही केले तरी दु:खच पदरात पडते. आपण समजून उमजून ज्या चुका करतो, त्यांचा दोष आपल्याकडे असतो. न समजता जी चूक होते त्याचा दोष नाही. प्रपंचाच्या आसक्तीने दु:खपरंपरा येते हा अनुभव दररोज येत असून आपण प्रपंचात आसक्ती ठेवतो, हा दोष नव्हे काय ? आपले कुठे चुकते ते पहावे आणि जे चुकते ते सुधारावे. प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात ? त्या मिळणे न मिळणे आपल्या हातातच नसते. मग अमुक हवे किंवा नको असे कशाला म्हणावे ? रामाचेच होऊन राहावे म्हणजे झाले ! जो रामाजवळ विषय मागतो, त्याला रामापेक्षा त्या विषयाचेच प्रेम जास्त आहे असे सिद्ध होते.

मी तुमच्याकडे येतो, पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवीत नाही. मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा; म्हणजे, सतत नामस्मरणात राहा. मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच. मला रामावाचून दुसरे जिवलग कोणी नाही. देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही. तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे यापलीकडे खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही. रात्रंदिवस माझ्या माणसांना मी हेच सांगत असतो की, वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका. जो माझा म्हणतो, त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे. जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका, आणि घ्यायचे झाले तर नामच घ्या. माझा नियम असा आहे की, परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये, की जी व्यवहाराच्या आड येईल. माझ्या गावी पैसा पिकत नाही. पण भक्ती मात्र खास पिकते. ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागेपुढे मी उभा आहे. मी तुमच्याजवळ आहेच; तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही नुसते नाम घ्या, बाकीचे सर्व मी करतो. शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे, मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे; ती मी सांभाळीन.

जेथे नाम तेथे मी । हा भरवसा बाळगून असावे तुम्ही ॥

Previous Post

बीड तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी योजनेची पेन्शन मिळण्यास विलंब.

Next Post

आजरा हायस्कूलमध्ये ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Related Posts

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली
Blog

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
0
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान
Blog

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026
19
अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड
Blog

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

September 29, 2026
2
Blog

भूमी अभिलेख प्रकरणातील अपील अमान्य; जिल्हा अधीक्षकांचा आदेश कायम

September 29, 2026
1
चांदवडचा ‘Trigger-1’ यादीत समावेश करा; भाऊसाहेब चौधरी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
Blog

चांदवडचा ‘Trigger-1’ यादीत समावेश करा; भाऊसाहेब चौधरी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

September 29, 2026
1
Blog

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी २०० फूट टॉवरवर अन्नत्याग आंदोलन

September 29, 2026
0
Next Post
आजरा हायस्कूलमध्ये ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

आजरा हायस्कूलमध्ये ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In