• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 1, 2026
in Blog
0
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

ब्रिक्स वुमन भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पाठिंब्यानंतर आमरण उपोषण अखेर स्थगित

येवला, दि. १ (प्रतिनिधी) : येवला तालुक्यातील बाभुळगाव खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील बंद करण्यात आलेला सार्वजनिक वहिवाट रस्ता तात्काळ मोकळा करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर अखेर स्थगित करण्यात आले. या आंदोलनाला ब्रिक्स वुमन भ्रष्टाचार निर्मूलन समितीने खंबीर पाठिंबा दिल्यानंतर प्रशासनाने संबंधित रस्ता अतिक्रमणातून मोकळा करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

सार्वजनिक वहिवाट रस्ता बंद झाल्यामुळे शेतकरी, शाळकरी विद्यार्थी, महिला तसेच ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येविरोधात सरला अरुण भूरक या पंचायत समिती, येवला येथे आमरण उपोषणाला बसल्या होत्या. गेल्या तीन दिवसांपासून हे आंदोलन सुरू होते.

आंदोलनाची माहिती मिळताच ब्रिक्स वुमन भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी समितीचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष योगेश ननवरे यांनी बाभुळगाव खुर्द येथे कार्यरत ग्रामविकास अधिकारी प्रवीण पठारे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली.

यानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. पारंपरिक वहिवाटीचा तसेच सार्वजनिक रस्ता अतिक्रमणातून मोकळा करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने आश्वासन देण्यात आले. प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आले असून, उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी समितीचे राष्ट्रीय समन्वयक हितेश दाभाडे, प्रदेश महिला कार्याध्यक्ष निर्मला बुल्हे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष योगेश ननवरे, उत्तर महाराष्ट्र विभागीय महिला अध्यक्ष पूजा पटेल, नाशिक संपर्कप्रमुख संजय गवारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला समितीच्या पाठिंब्यामुळे प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्याने ग्रामस्थांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

Previous Post

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

Next Post

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
0
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
4
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
2
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
1
खानदेशातील विविध रोजगार मेळाव्यात ‘स्व. विपुल खेडकर फाउंडेशन’च्या प्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग
Blog

खानदेशातील विविध रोजगार मेळाव्यात ‘स्व. विपुल खेडकर फाउंडेशन’च्या प्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग

October 1, 2026
0
Next Post
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In