सामाजिक कार्याची दखल; विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
चांदवड, दि. १ (प्रतिनिधी) : दुगाव, ता. चांदवड येथील सामाजिक कार्यात सक्रिय असलेले आणि युवक-युवतींच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
युवकांच्या विविध प्रश्नांसाठी तसेच अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठविणाऱ्या सोहम अहिरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मागील महिन्यात त्यांचा पक्षप्रवेश झाला होता. त्यानंतर त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
युवक-युवतींच्या प्रश्नांना वाचा फोडणे, सामाजिक उपक्रमांना चालना देणे आणि युवकांना संघटित करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे सोहम अहिरे यांनी सांगितले.
त्यांच्या निवडीबद्दल चांदवड तालुक्यासह विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा द







