• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

खारेकुरण येथे रंगेहाथ कारवाई; प्रदीप महाजनविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

पालघर : प्रतिनिधी

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

वीज मीटर तपासल्यानंतर वाढीव वीज बिल ‘सेटल’ करून देण्यासाठी ग्राहकाकडे ८ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या वायरमनला पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई पालघर तालुक्यातील खारेकुरण येथे करण्यात आली.

प्रदीप सुभाष महाजन (वय ३८), वायरमन (कनिष्ठ तंत्रज्ञ), एमएसईडीसीएल, रा. उमरोळी, ता. जि. पालघर, असे एसीबीच्या कारवाईत पकडण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत एका तक्रारदाराने पालघर एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या घरी महाजन याने वीज मीटरची तपासणी केली होती. त्यानंतर घराचे वाढीव येणारे वीज बिल ‘सेटल’ करून देण्यासाठी त्याने ८ हजार रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

तक्रारीची एसीबीकडून १९ ऑगस्ट २०२६ रोजी दांडीपाडा, खारेकुरण, ता. जि. पालघर येथे पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान महाजन याने तक्रारदाराकडे वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने सांगितले.

यानंतर एसीबीने सापळा कारवाईचे नियोजन केले. २० ऑगस्ट २०२६ रोजी मिठागर रोड, खारेकुरण येथे कायदेशीर सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान प्रदीप महाजन याला तक्रारदाराकडून ८ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ (सुधारित अधिनियम २०१८) कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीच्या अटकेसंदर्भातील पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक राकेश लक्ष्मण डांगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक दादाराम सुभाष करांडे यांच्या पर्यवेक्षणाखाली सापळा पथकाने कारवाई केली. पथकात पोलीस निरीक्षक राकेश डांगे यांच्यासह पोलीस हवालदार विलास भोये, जितेंद्र गवळी, प्रकाश दळवी आणि आकाश लोहार यांचा समावेश होता.

Tags: Kevil Patil
Previous Post

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

Next Post

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
93
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
Next Post

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In