अलिबाग :
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, ब्रांच पोयनाड व अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संत निरंकारी मंडळ (रजि.), दिल्ली, ब्रांच पोयनाड-अलिबाग यांच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबिर रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता संत निरंकारी सत्संग भवन, बांधण-पोयनाड-पेझारी, बांधण एमआयडीसी रोड, ता. अलिबाग येथे होणार आहे.
गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, हा या रक्तदान शिबिराचा प्रमुख उद्देश आहे. ‘रक्तदान हे जीवनदान आहे’ या संदेशातून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन संत निरंकारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
या शिबिराला विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिकांची विशेष उपस्थिती राहणार आहे. शिबिराचे उद्घाटन झोनल प्रमुख आदरणीय प्रकाश म्हात्रे जी महात्मा यांच्या उपस्थितीत होणार आहे.
रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत करण्याची संधी नागरिकांना मिळणार असून, सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संपर्क :
मा. ही. पाटील जी
प्रवीण पाटील जी
जीवन पाटील जी
विजय आहेर जी
जगदीश कोळी जी



