• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 5, 2026
in Blog
0
पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

मान्यवरांची उपस्थिती; ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तीसमोर भक्तांचा जल्लोष

पेण : वार्ताहर : रायगड जिल्ह्यातील पेण तालुका आणि पेण शहर हे श्री गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. पेणच्या गणेशमूर्तींना महाराष्ट्रासह देश-विदेशात मोठी मागणी असून, दरवर्षी येथील गणेशमूर्तींची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह लंडन, अमेरिका यांसह अनेक देशांमध्ये निर्यात केली जाते.

RelatedPosts

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

याच गणेशभक्तीची परंपरा जपत पेण तालुक्यातील जोहे गावात पत्रकार देवा पेरवी यांच्या पुढाकाराने जोहेचा राजा प्रतिष्ठानतर्फे भव्य महाआरती सोहळा २०२६ उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री तथा मंत्री भरतशेठ गोगावले, रायगड जिल्हा परिषद अलिबागचे सभापती वैकुंठशेठ पाटील, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यासह रायगड जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

जोहेचा राजा प्रतिष्ठानच्या या भव्य सोहळ्यास जोहे गावातील तरुण मित्र मंडळे, ग्रामस्थ, महिला मंडळ तसेच प्रतिष्ठानचे युवा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाआरतीच्या वेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी पत्रकार देवा पेरवी यांनी ‘जोहेचा राजा’ गणेशमूर्ती उचलून अनोख्या पद्धतीने नृत्याचा जल्लोष केला. त्यांच्या या उत्स्फूर्त सहभागाने उपस्थित तरुणाई, महिला मंडळ व ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला. ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात उपस्थितांनी या सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला.

गणेशभक्ती, सामाजिक एकोपा आणि उत्साहाचा संगम घडविणारा हा महाआरती सोहळा जोहे गावात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. जोहेचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ आणि गणेशभक्तांनी कौतुक केले.

Tags: Pradip Satane
Previous Post

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

Related Posts

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
0
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
7
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
198
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
10

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In