• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
16
VIEWS
Ad 1
Ad 1

अमळनेर (प्रतिनिधी):

२७ ऑगस्ट २०२६: तालुक्यातील टाकरखेडा येथे एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पती-पत्नीने आपल्या दोन निष्पाप मुलांसह धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत सामूहिक आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना आज, २७ ऑगस्ट रोजी पहाटे ४ ते ५ वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे संपूर्ण अमळनेर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात तीव्र खळबळ उडाली आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

पहाटे घरातून निघाले आणि घात झाला

मिळालेल्या माहितीनुसार, टाकरखेडा येथील रहिवासी सुनील अमृत भिल आणि त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. पहाटे ४ वाजेच्या सुमारास ते दुसरी इयत्तेत शिकणारा मुलगा सनी आणि अंगणवाडीत जाणारा लहान मुलगा राज या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी रेल्वे रुळाकडे धाव घेत धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली. रेल्वेची धडक एवढी भीषण होती की, चौघांचाही जागीच अंत झाला.

रेल्वे प्रशासनाची पोलिसांना माहिती व घटनास्थळी धाव

पहाटे ४:४० वाजेच्या सुमारास रेल्वे रुळावर मृतदेह पडल्याचे निदर्शनास येताच रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने अमळनेर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) गणेश अहिरे, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, विजय भोई, योगेश बागुल आणि राहुल पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम्याची कारवाई सुरू केली.

गावावर शोककळा; कौटुंबिक वादाची चर्चा

एकाच घरातील चार जणांचा असा करुण आणि दुर्दैवी अंत झाल्याने टाकरखेडा गावावर तीव्र शोककळा पसरली आहे. या सामूहिक आत्महत्येचे अधिकृत कारण अद्याप समोर आले नसले, तरी प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादातून हा टोकाचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे. अमळनेर पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

Ad 1
Tags: Manish Jadhav
Previous Post

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

Next Post

श्रावण महिन्यात श्री क्षेत्र दंडोबा भक्तिमय; ईदच्या सुट्टीमुळे पर्यटकांची अलोट गर्दी

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

श्रावण महिन्यात श्री क्षेत्र दंडोबा भक्तिमय; ईदच्या सुट्टीमुळे पर्यटकांची अलोट गर्दी

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In