• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देवळ्यात ‘शाडू मातीपासून गणेशमूर्ती’ निर्मिती कार्यशाळा; ७५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 27, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी साकारल्या गणेशमूर्ती

देवळा | २७ ऑगस्ट २०२६

मातीशी नाते जोडत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने देवळा येथे ‘शाडू मातीपासून गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले. ‘शाडू मातीची गणेशमूर्ती घडवूया आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया’ या संदेशाने आयोजित कार्यशाळेत तब्बल ७५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

RelatedPosts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय, जिजामाता कन्या विद्यालय, श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल, डॉ. डी. एस. आहेर इंग्लिश मीडियम स्कूल, महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ देवळा तालुका आणि रोटरी क्लब ऑफ देवळा टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच देवळा नगरपंचायतीच्या सौजन्याने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

सुप्रसिद्ध चित्रकार व मूर्तिकार सागर पवार यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी गणेशमूर्ती साकारताना मोठा उत्साह दाखविला. यावेळी पर्यावरणपूरक गणेशोत्सव, जलप्रदूषण टाळणे आणि निसर्गाचा समतोल राखण्याबाबतही जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर होते. प्रमुख अतिथी म्हणून सागर पवार, डॉ. सौ. मालतीताई आहेर, प्रमोद ढोरजकर, रोटे. दिनकर देवरे आणि प्रा. बापू रौंदळ उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष भाग्यश्री पवार, उपनगराध्यक्ष संभाजी आहेर, गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, केंद्रप्रमुख पी. के. आहेर, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, नगरपंचायत पदाधिकारी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यशाळेचे प्रास्ताविक एस. टी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन एस. एन. आहेर यांनी केले, तर आभार सुनीता पगार यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. भारत पवार यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या हातून साकारलेल्या शाडू मातीच्या गणेशमूर्तींमधून ‘मातीपासून मूर्ती, मूर्तीपासून संस्कार आणि संस्कारातून पर्यावरण संवर्धन’ हा संदेश देण्यात आला. देवळ्यातील हा उपक्रम शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला.

Ad 1
Previous Post

डोंगरगाव कालव्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सायगावात आत्मक्लेश आंदोलन व आमरण उपोषण

Next Post

जय हिंद करिअर अकॅडमीचे दोन विद्यार्थी भारतीय सैन्यात दाखल; फलटण परिसरात आनंदाचे वातावरण

Related Posts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!
Blog

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
9
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी
Blog

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
8
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..
Blog

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026
5
औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?
Blog

औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?

October 11, 2026
58
शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड
Blog

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

October 11, 2026
44
दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा
Blog

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
12
Next Post

जय हिंद करिअर अकॅडमीचे दोन विद्यार्थी भारतीय सैन्यात दाखल; फलटण परिसरात आनंदाचे वातावरण

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In